Thursday, April 25, 2024
Homeमुख्य बातम्यानाशिककरांनो! श्रावणी सोमवारी 'असे' राहणार वाहतुकीचे मार्ग, जाणून घ्या बदल

नाशिककरांनो! श्रावणी सोमवारी ‘असे’ राहणार वाहतुकीचे मार्ग, जाणून घ्या बदल

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

तिसऱ्या श्रावण सोमवारी (Shrivani Somwar) जिल्हाभरातून भाविक मोठ्या संख्येने त्रंबकेश्वर (Trimbakeshwar) येथे जाण्यासाठी सीबीएस बस स्थानक (CBS Bus Stand) येथे येत असल्याने येथे वाहतुकीची कोंडी (Traffic Jam) होऊ नये याकरिता रविवारी (दि. १४) दुपारी २ वाजेपासून सोमवार ( दि.१५) रात्री आठ वाजेपर्यंत टिळकवाडीकडे (Tilakwadi) जाणाऱ्या व येणाऱ्या सर्वसाधारण वाहतुकीस प्रतिबंध करण्यासंदर्भात पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे (Jayant Naiknavare) यांनी अधिसूचना जाहीर केली आहे…

- Advertisement -

यावेळी वाहतूक मार्गात करण्यात आलेल्या बदलामध्ये सीबीएस चौकातुन शरणपुररोडने टिळकवाडी चौफुली पर्यंत जाणाऱ्या रस्त्यावर एसटी बसेस व शहर वाहतुकीच्या बसेस वगळुन इतर सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद करण्यात आली आहे.

सीबीएस चौकातून टिळकवाडी सिग्नलकडे जाणा-या वाहनचालकांनी सीबीएस चौकातुन मोडक सिग्नल, हॉटेल राजदुत मार्गे किंवा सीबीएस सिग्नल येथुन मेहेर सिग्नल, अशोकस्तंभ मार्गे गंगापुररोडने पुढे जावे.

शरणपुररोडवरील टिळकवाडी सिग्नल येथून सीबीएस चौकाकडे एसटी बसेस व शहर वाहतुक बसेस वगळुन सर्वप्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद करण्यात आली आहे. टिळकवाडी सिग्नल येथुन सीबीएसकडे जाणारी वाहतुक ही टिळकवाडी सिग्नल, जलतरण तलाव सिग्नल, मोडक सिग्नल वरून सीबीएसकडे जातील.

किंवा टिळकवाडी सिग्नलवरून पंडीत कॉलनी मार्गे गंगापुररोडने अशोकस्तंभ मार्गे पुढे जावे. सदरहू सर्व प्रकारचे निर्बंध हे पोलीस सेवेतील वाहने, रुग्णवाहिका, शववाहिका व अग्नीशमनदलाची वाहने यांना लागू राहणार नसल्याचे पोलीस आयुक्तांनी जारी केलेल्या परिपत्रकात नमूद केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या