Sunday, April 28, 2024
Homeनाशिकडी. फार्मसीच्या अभ्यासक्रमात बदल!

डी. फार्मसीच्या अभ्यासक्रमात बदल!

नाशिक । प्रतिनिधी Nashik

डी. फार्मसी या औषधनिर्माणशास्त्र शाखेतील पदविका अभ्यासक्रमात तब्बल तीस वर्षांनी बदल केले जात आहेत.

- Advertisement -

नवीन विषयांचा समावेश तसेच अभ्यासक्रम रुग्णाच्या हिताच्या अनुषंगाने तयार केला असल्याने या अभ्यासक्रमामुळे सकारात्मक बदल घडून येतील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. फार्मसी कौन्सिल ऑफ इंडियाने (पीसीआय) यासंदर्भात अधिसूचना जारी केली आहे.

अभ्यासक्रमात बदलाकरता संसदेची परवानगी घेणे बंधनकारक असताना गेल्या अनेक वर्षांपासून या प्रक्रियेमुळे अभ्यासक्रमात अपेक्षित बदल झालेला नव्हता. परंतु बदलत्या परिस्थितीनुसार अखेर अभ्यासक्रमातही बदल करण्यात आला आहे. प्रसिद्ध केलेल्या अधिसूचनेत प्रवेशाची पात्रता, अभ्यासक्रमातील विषयांचा तपशील, अध्ययन कालावधीची माहिती, परीक्षा पद्धती, प्राध्यापकांची अर्हता यासह अन्य सविस्तर तपशील दिलेला आहे.

गेल्या काही वर्षांमध्ये औषधनिर्माणशास्त्र शाखेत झालेल्या बदलांची दखल घेत या अभ्यासक्रमातही सुधारणा करण्यात आल्या आहेत. केवळ शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांनाच नव्हे तर आधुनिक ज्ञान ग्रहण केलेले फार्मसिस्ट भविष्यात घडणार असल्याने रुग्णांनादेखील अप्रत्यक्षरीत्या या शिक्षणक्रमाचा लाभ होणार आहे.

नवीन विषयांचा समावेश

प्रथम वर्षात यापूर्वी फार्मसिटिक्स भाग एक आणि दोन स्वतंत्र होते. नवीन शिक्षणक्रमात ते एक केले आहेत. सोशल फार्मसी या नवीन विषयाचा समावेश केला आहे. फार्मास्युटिकल केमिट्री, फार्माकोग्नसी, नॉटॉमी फिजिओलॉजी या विषयांमध्ये आवश्यक सुधारणा केल्या आहेत. द्वितीय वर्षात कम्युनिटी फार्मसी अ‍ॅन्ड मॅनेजमेंट, फार्मेकॉथेरिपिस्ट या विषयांची भर घालण्यात आली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या