शेतकर्‍यांकडे पाहण्याची मानसिकता बदला : भुसे

जिल्हा कृषी महोत्सवाचे उद्घाटन, डॉ. पवार यांची उपस्थिती
शेतकर्‍यांकडे पाहण्याची मानसिकता बदला : भुसे

नाशिक । प्रतिनिधी Nashik

शेतकर्‍यांबरोबर ( Farmers )राहणे व त्यांचे काम करणे हे कोणतेही सरकार असो त्याचे कामच आहे. मात्र, जोपर्यंत समाजाची व जनतेची शेतकर्‍यांकडे बघण्याची मानसिकता बदलत नाही, तोपर्यंत शेतकर्‍याला त्याच्या कष्टाच्या न्याय मिळणार नाही. त्यासाठी प्रत्येकाने मानसिकता बदलावी, असे आवाहन पालकमंत्री दादा भुसे (Guardian Minister Dada Bhuse)यांनी केले.

महाराष्ट्र शासन कृषी विभाग व तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (Government of Maharashtra Department of Agriculture and Technology Management System) यांच्या वतीने जिल्हा कृषी महोत्सव 2022 (District Agricultural Festival 2022) चे उद्घाटन डोंगरे वसतीगृह येथे पालकमंत्री भुसे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून आ. सीमा हिरे उपस्थित होत्या. केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी दूरदृश्यद्वारे संबोधित केले. स्वागत विभागीय कृषी संचालक मोहन वाघ यांनी केले.

पालकमंत्री भुसे म्हणाले की, शेतकर्‍यांकडे बघण्याची मानसिकता जनतेने बदलणे आवश्यक आहे. शेतकर्‍यांना दोन पैसे ज्यादा मिळत नाही तोपर्यंत त्याच्या कष्टाला न्याय मिळणार नाही. राज्यातील शेतकरी हा अतिवृष्टी, कमी पाऊस, वादळ तर कधी कर्ज मिळत नाही. विजेचा तुटवडा अशा विविध अडचणींच्या चक्रव्युहात सापडत आहे. यातून तो मार्ग काढत नाही तर त्याला त्याच्या शेतमालाला योग्य भाव मिळत नाही. त्यामुळे शेतकर्‍याला मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. कृषी विभागाच्या विविध योजनांचा लाभ देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. महिलांसाठी लक्ष्मी योजना असून या योजनेत अधिकाधिक महिला शेतकर्‍यांनी सहभागी व्हावे, असे आवाहनही पालकमंत्र्यांनी केले.

केंद्रीय राज्यमंत्री डॉ. पवार म्हणाल्या, निर्यातक्षम शेती उत्पादनासाठी अधिकाधिक प्रयत्न शेतकर्‍यांनी करणे गरजेचे आहे. यासाठी तरुण शेतकर्‍यांना कृषी विभागातर्फे कृषी तंत्रज्ञान पुरवावे, तसेच योग्य मार्गदर्शन केल्यास असे उत्पादन निश्चितच वाढेल. यावेळी आ. हिरे यांनी शेतकर्‍यांच्या समोर अनेक अडचणी असून त्या सोडविण्यासाठी राज्यशासन प्रयत्न करत असून त्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे सांगितले. प्रास्ताविक प्रकल्प संचालक (आत्म) राजेंद्र निकम यांनी केले. यावेळी प्रगतशील महिला शेतकरी मनीषा इंगळे, जिल्हा अधीक्षक विवेक सोनवणे, जिल्हा परिषदेचे जिल्हा कृषी अधिकारी रमेश शिंदे यांच्यासह कृषी विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

शेतकर्‍यांना लवकरच नुकसानभरपाई

अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या 46 हजार शेतकर्‍यांना पिकविमा कंपनीने 14 कोटी 50 लाख रुपये भरपाई दिलेली आहे. उर्वरित शेतकर्‍यांना लवकर भरपाई देण्याच्या सूचना विमा कंपन्यांना देण्यात आल्या आहेत. संततधार पावसामुळे होणार्‍या नुकसानग्रस्त शेतकर्‍यांनाही मदत करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्याची माहिती पालकमंत्री दादा भुसे यांनी दिली.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com