Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्याप्रदेशाध्यक्षपदी निवड होताच बावनकुळेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...

प्रदेशाध्यक्षपदी निवड होताच बावनकुळेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…

मुंबई | Mumbai

राज्य मंत्रिमंडळाचा (State Cabinet) पहिल्या टप्प्याचा विस्तार पार पडल्यानंतर राज्यातील राजकीय समीकरणे बदलून गेली आहे. चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांना शिंदे – फडणवीस सरकारच्या (Shinde – Fadnavis Government) मंत्रिमंडळात स्थान मिळाल्यानंतर भाजपचे (BJP) नवीन प्रदेशाध्यक्ष कोण होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून होते. अखेर आज भाजपने चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule)यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपद सोपवले आहे. त्यानंतर बावनकुळेंनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे…

- Advertisement -

यावेळी बावनकुळे म्हणाले की, मी आज माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांचे आभार मानतो. महाराष्ट्राचे आमचे नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) चंद्रकांत पाटील आणि महाराष्ट्राच्या सर्व कार्यकर्त्यांचेही खऱ्या अर्थाने आज आभार मानतो, त्यांनी माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्यावर ही जबाबदारी दिली आणि या जबाबदारीतून मला पुढच्या काळामध्ये सर्वांना सोबत घेऊन भारतीय जनता पक्ष महाराष्ट्रात अजून नंबर एकचा पक्ष कसा करता येईल, यासाठी प्रयत्न करणार असल्याचे ते म्हणाले.

तसेच लोकसभेमध्ये (Lok Sabha) भाजप आणि शिवसेना (BJP and ShivSena) मिळून ४५ पेक्षा जास्त जागा आणि विधानसभेमध्ये २०० पेक्षा जास्त जागा निवडून आणणार असेही त्यांनी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या