उद्धव ठाकरेंमुळे वेदांत फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला गेला : बावनकुळे

उद्धव ठाकरेंमुळे वेदांत फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला  गेला : बावनकुळे

मुंबई |Mumbai

महाविकास आघाडीचे सरकार (Mahavikas Aghadi Government) असताना त्यावेळचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) अठरा महिने मंत्रालयतही गेले नाहीत. त्यांच्या दिरंगाईमुळे आणि निष्काळजीपणामुळे वेदांता फॉक्सकॉनचा प्रकल्प (Vedanta Foxconn Project) गुजरातमध्ये (Gujarat) गेला.

हा प्रकल्प महाराष्ट्राबाहेर जाण्यास उद्धव ठाकरेच जबाबदार आहेत, अशी घणाघाती टीका भाजपचे (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule) यांनी केली.

तसेच माजी मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) वेदांता फॉक्सकॉन प्रकल्पाच्या विषयावरून तळेगाव (Talegaon) येथे करत असलेले आंदोलन म्हणजे खोटारडेपणा असून हे आंदोलन म्हणजे इव्हेंट मॅनेजमेंट करून जनतेची दिशाभूल करणे आहे, असेही बावनकुळे म्हणाले.

तर आदित्य ठाकरे यांनी महाविकास आघाडी सरकारच्या काळात राज्यात वेदांता फॉक्सकॉनचा प्रकल्प उभारण्यासाठी केलेला सामंजस्य करार दाखवावा आणि त्या प्रकल्पाला तळेगावमध्ये नेमका कोणता भूखंड दिला त्याचा त्यांच्या सरकारच्या काळातील आदेश दाखवावा, असे आव्हानही बावनकुळे यांनी दिले.

तसेच राज्यातील १६ लोकसभा मतदारसंघात केंद्रीय मंत्री प्रवास करत असून केंद्र सरकारच्या गरीब कल्याणाच्या योजनांच्या अंमलबजावणीचा आढावा घेत आहेत. त्याप्रमाणे बारामती मतदारसंघाचा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन (Nirmala Sitharaman) यांनी आढावा घेतला. बारामती मतदारसंघात आगामी निवडणुकीत राष्ट्रवादीचे (NCP) घड्याळ बंद पडले पाहिजे, असा आमचा निर्धार आहे, असेही बावनकुळे यांनी सांगितले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com