हा तर शिवसेनेला संपवण्याचा राष्ट्रवादीचा प्लॅन

चंद्रकांत पाटील
चंद्रकांत पाटील

मुंबै बँकेच्या अध्यक्ष पदासाठी आणि उपाध्यक्ष पदासाठीची निवडणुकीसाठी (Mumbai Bank election) गुरुवारी शिवसेना (Shiv Sena) आणि राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) एकत्र आले. त्यानंतर अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या सिद्धार्थ कांबळे (Siddharth Kamble) यांची निवड झाली आहे. तर, उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवाराचा मात्र पराभव झाला आहे. उपाध्यक्ष पदासाठी भाजपचे उमेदवार विठ्ठल भोसले (Vitthal Bhosale) यांची निवड झाली. यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

कोल्हापूरमध्ये माध्यमांशी बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेसने मुंबै बँकेच्या अध्यक्षपद मिळवण्यात यश मिळवलं पण शिवसेनेचा उमेदवार उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत पडला... कसं झालं हे? आता हे शिवसेनेला कळत नाहीये की, तुम्हाला पूर्णपणे संपवण्याचा एक प्लॅन चालला आहे आणि त्या प्लॅनमध्ये तुम्ही फसत चालला आहे.

मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी दुसऱ्याकडे देण्याची वेळ

कोल्हापूरमध्ये माध्यमांशी बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले, “कालची बैठक ही अत्यंत महत्वपूर्ण होती, तुम्ही टोपेंना पाठवलं, दिलीप वळसेंना पाठवलं. देशाच्या सगळ्या राज्यांचे मुख्यमंत्री असताना, आपल्या राज्याच्या आरोग्यमंत्र्यांना बोलायला वाव मिळणार नाहीच. पण तेच जर तुम्ही असता तर तुम्ही केवळ मुख्यमंत्री नाहीत, तर तुमचे खूप जवळचे संबंध देखील आहेत. तुम्ही तब्येतीमुळे नाही जाऊ शकलात आणि तब्येतीची हेळसांड देखील करू नये. परंतु, राज्याच्या हितासाठी अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत. घरी बसून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे मार्गदर्शन करतो वैगरे हे पुरत नाही. मग सगळ्या मुख्यमंत्र्यांनी तसच केलं असतं. मुख्यमंत्री म्हणजे उठणे, जाणे, भेटणे, चर्चा करणे, लोकांमध्ये विश्वास निर्माण करणे असं आहे. मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी खरंच दुसऱ्याकडे देण्याची ही वेळ आहे

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com