सतेज पाटील
सतेज पाटील|राजकीय
मुख्य बातम्या

चंद्रकांत पाटील पुण्याचे, सुट्टीसाठी कोल्हापुरात येतात

राज्यभरात सुरू असलेल्या भाजपच्या आंदोलनावर सतेज पाटील यांची टीका

Nilesh Jadhav

कोल्हापूर | Kolhapur

राज्यभरात आज भाजपाचे दूध दरवाढीसाठी व अन्य मागण्यासाठी आंदोलन सुरू आहे. गृहराज्य मंत्री आणि काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी यावर प्रतिक्रिया देताना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे.

सतेज पाटील यांनी म्हंटले आहे, "चंद्रकांत पाटील हे पुण्याचे, सुट्टीसाठी ते कोल्हापुरात येतात. हिंमत असेल तर त्यांनी केंद्राविरोधात आंदोलन करावे. ते केंद्र सरकारविरोधात आंदोलन का करत नाहीत." असा प्रतिप्रश्न देखील त्यांनी चंद्रकांत पाटील यांना केला आहे. तसेच "काही तर अस्तित्व दाखवण्यासाठी हे आंदोलन करत आहे. लोकांच्या हितासाठी हे आंदोलन नाही. तुम्ही काय काम केलं हे जनतेला माहित आहे. दूध उत्पादकांची कणव भाजपला नाही. केंद्राची जबाबदारी महत्वाची आहे” असे म्हणत त्यांनी माजी खासदार व त्यांचे विरोधक धनजंय महाडिक यांना लगावला आहे.

Deshdoot Digital Dhamaka | देशदूत डिजिटल धमाका
www.deshdoot.com