सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता; हवामान विभागाचा अंदाज

सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता; हवामान विभागाचा अंदाज

पुणे । प्रतिनिधी Pune

जुलै आणि ऑगस्ट महिन्यात धुवांधार बॅटींग करणारा मान्सून सप्टेंबर महिन्यातही सक्रिय राहणार आहे. एवढेंच नाही तर देशभरात सरासरीपेक्षा अधिक पाऊस ( Rain )पडेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

हंगामाच्या अखेरच्या महिन्यात देशभरात 109 टक्के पावसाचा अंदाज हवामान विभागाने (Department of Meteorology)वर्तविला आहे. वायव्य भारतातून मान्सूनच्या परतीचा प्रवास सप्टेंबर महिन्याच्या मध्यानंतर सुरु होण्याची शक्यताही वर्तविण्यात आली आहे.

हवामान शास्त्र विभागाचे महासंचालक डॉ. मृत्युंजय महापात्रा यांनी ऑनलाइन पत्रकार परिषदेत सप्टेंबर महिन्यातील पावसाचा अंदाज जाहीर केला. 1971 ते 2020 कालावधीत देशातील मॉन्सून पावसाची आकडेवारी पाहता, सप्टेंबर महिन्यात देशात सरासरी 167. 9 मिलिमीटर पाऊस पडतो. सरासरीच्या 96 ते 104 टक्के पाऊस सर्वसाधारण मानला जातो.

सप्टेंबर महिन्यात महाराष्ट्रात पडणार्‍या पावसाचा अंदाज विचारात घेता राज्याच्या सर्वच भागात सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता आहे. यातही कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याच्या बहुतांश भागात सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडण्याची शक्यता अधिक असल्याचे हवामान विभागाने प्रसिद्ध केलेल्या नकाशावरून स्पष्ट होत आहे. प्रशांत महासागराच्या विषुववृत्तीय भागात ला-निना स्थिती वर्षाअखेरीपर्यंत कायम राहण्याची शक्यता असून, इंडियन ओशन डायपोल (आयओडी) नकारात्मक राहण्याचे संकेत वर्तविण्यात आले आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com