Thursday, April 25, 2024
Homeमुख्य बातम्याWeather Update : राज्यातील 'या' भागात अवकाळी पावसाची शक्यता

Weather Update : राज्यातील ‘या’ भागात अवकाळी पावसाची शक्यता

मुंबई | Mumbai

राज्यातील वातावरणात सातत्याने बदल होत असून उष्णतेत वाढ होत आहे. त्यामुळे कुठे उन्हाचा चटका जाणवत आहे.तर कधी अवकाळी पाऊस (Unseasonal Rain) कोसळत आहे. त्यातच काल देखील राज्यातील काही भागांत अवकाळी पावसाने हजेरी लावली होती. त्यानंतर आज पुन्हा एकदा राज्यातील काही भागांत अवकाळी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे…

- Advertisement -

ज्येष्ठ निरुपणकार पद्मश्री आप्पासाहेब धर्माधिकारी यांचा ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कारानं गौरव

याबाबत हवामान विभागाने (Meteorological Department) दिलेल्या माहितीनुसार, आज पश्चिम महाराष्ट्रातील (Western Maharashtra) सोलापूर, सांगली आणि कोल्हापूर या जिल्ह्यासह मराठवाड्यातील (Marathwada) लातूर आणि धाराशिव जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे. तर पुढील दोन दिवसांसाठी राज्यात यलो आणि ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे काही भागांत पावसाचा तर काही भागांना कडक उन्हाचा (Summer) तडाखा बसणार आहे.

Video : अमित शहांचा मुंबई दौरा; ट्राफिक अडवली पिंपळगावला?

तर दुसरीकडे आजपासून संपूर्ण महाराष्ट्रात अपेक्षित असलेले अवकाळी वातावरण निवळण्याची शक्यता असल्याची माहिती ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे (Manikrao Khule) यांनी दिली आहे. त्यानुसार कोकणातील चार आणि विदर्भातील ११ अशा एकूण १५ जिल्ह्यांत १६ आणि १७ तारखेला वातावरण निवळण्याची शक्यता आहे. तसेच मध्य महाराष्ट्रातील १०, मराठवाड्यातील ८ अशा एकूण १८ जिल्ह्यांत रविवार २३ एप्रिलपर्यंत अवकाळी पावसाचे वातावरण टिकून राहण्याची शक्यता असल्याचे खुळे यांनी सांगितले.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

- Advertisment -

ताज्या बातम्या