राज्यातील 'या' भागात पुन्हा अवकाळी पावसाची शक्यता; हवामान विभागाकडून अलर्ट जारी

राज्यातील 'या' भागात पुन्हा अवकाळी पावसाची शक्यता; हवामान विभागाकडून अलर्ट जारी

मुंबई | Mumbai

मागील काही दिवसांपासून सातत्याने कोसळणाऱ्या अवकाळी पावसाने (Unseasonal Rain) राज्यात थैमान घातले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या (Farmers)हाताशी आलेल्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान (Damage) झाले असून शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यानंतर आता पुन्हा एकदा हवामान विभागाकडून राज्यात पावसाचा यलो अलर्ट (Yellow Alert) जारी करण्यात आला आहे...

राज्यातील 'या' भागात पुन्हा अवकाळी पावसाची शक्यता; हवामान विभागाकडून अलर्ट जारी
सातपूरला युवकावर गोळीबार

याबाबत हवामान विभागाने (Meteorological Department) दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील मध्य महाराष्ट्रातील नाशिक आणि नगर, मराठवाड्यातील हिंगोली, नांदेड, लातूर व विदर्भातील अकोला, नागपूर, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांना गारपीठ आणि वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा इशारा दिला आहे.

राज्यातील 'या' भागात पुन्हा अवकाळी पावसाची शक्यता; हवामान विभागाकडून अलर्ट जारी
Nashik : 'त्या' मारहाण प्रकरणातील आरोपीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

तसेच आज राज्यातील मुंबईसह कोकण वगळता उर्वरित महाराष्ट्रातील १० जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. तर उद्या (दि. २०) मार्च रोजी देखील राज्यात पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com