उत्तर महाराष्ट्रात तुरळक पावसाची शक्यता

उत्तर महाराष्ट्रात तुरळक पावसाची शक्यता

नाशिक । प्रतिनिधी Nashik

अरबी समुद्रात अल्प कालावधीचा कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे याचा फटका उत्तर महाराष्ट्राला बसला असुन यामुळे राज्यात उत्तर व मध्य महाराष्ट्र बहुतांशी भागात किमान तापमानात लक्षणिय वाढ व विदर्भातील तुरळक भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणिय घट झाली आहे.

परिणामी मध्य महाराष्ट्र, विदर्भ व मराठवाड्यात तुरळक भागात येत्या 25, 26 व 27 नोव्हेंबर रोजी तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तविली आहे. यामुळे पुन्हा एकदा जिल्ह्यातील द्राक्षबागाईतदारांची चिंता वाढविली आहे.

राज्यात आलेली गुलाबी थंडी मागील दहा दिवसात गायब झाली आहे. अरबी समुद्रावर कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे पुन्हा एकदा वातावरणात अचानक बदल झाला आहे. या अल्पकालीन बदलामुळे मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याच्या बहुतांशी भागात व विदर्भातील काही भागात सरासरीच्या तुलनेत किमान तापमानात अचानक 6 ते 7 अंशाने वाढले आहे.

यामुळे राज्यात गेल्या 19 व 20 नोव्हेंबर रोजी तुरळक पाऊस झाला होता. आता पुन्हा एकदा पाऊसाचे वातावरण निर्माण झाले आहे. राज्यात किमान तापमानात वाढ झाली असल्याने आता 25 ते 27 नोव्हेंबर या दरम्यान राज्यात तुरळक भागात पाऊसाची शक्यता आहे. यात उत्तर महाराष्ट्रात येत्या दोन दिवसात तुरळक पाऊस पडणार असल्याने शेतकर्‍यांची चिंता वाढली आहे.

जिल्ह्यात पाच दिवसात असे बदलले तापमान

* 20 नोव्हेंबर - 19.4 अंश सेल्सीअस

* 21 नोव्हेंबर - 15.9 अंश

* 22 नोव्हेंबर - 16.0 अंश

* 23 नोव्हेंबर - 15.0 अंश

* 24 नोव्हेंबर - 16.8 अंश सेल्सीअस

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com