Wednesday, April 24, 2024
Homeमुख्य बातम्यागारपीटीसह पावसाची शक्यता: हवामान तज्ञ खुळे

गारपीटीसह पावसाची शक्यता: हवामान तज्ञ खुळे

नाशिक । प्रतिनिधी | Nashik

संपूर्ण महाराष्ट्रात (maharashtra) गुरुवार दि.१६ ते शनिवार दि.१८ मार्चपर्यंत (तीन दिवस) तुरळक ठिकाणी वीजा, वारा, गडगडाटीसह

- Advertisement -

किरकोळ पावसाची शक्यता (Chance of rain) अधिक वाढली आहे, असा अंदाज पुणे वेधशाळेचे निवृत्त हवामान तज्ञ माणिकराव खुळे (Manikrao Khule, Retired Meteorologist, Pune Observatory) यांनी वर्तविला आहे.

विशेषतः पावसाच्या (rain) तीव्रतेची निश्चिती दि. १६ व १७ मार्च (गुरु-शुक्र) रोजी दोन दिवस मुंबईसह (mumbai) कोकण (Konkan) वगळता उर्वरित महाराष्ट्रातील मराठवाडा (marathwada) व विदर्भात अधिक तर मध्य महाराष्ट्रातील १० जिल्ह्यात मध्यमच शक्यता जाणवते.

गारपीट

मुंबईसह कोकण वगळता उर्वरित महाराष्ट्रातील खालील भागात तुरळक ठिकाणी गारपीट (Hail) होण्याची शक्यता आहे. विदर्भ – गुरुवार व शुक्रवार (१६ व १७ मार्च ) ३ दिवस विशेषतः गोंदिया, भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ जिल्ह्यात शक्यता अधिक मराठवाड- गुरुवार, १६ मार्चपर्यत विशेषतः उस्मानाबाद, लातूर, हिंगोली, नांदेड जिल्ह्यात शक्यता अधिक मध्य

महाराष्ट्र – गुरुवार, १६ मार्चपर्यंत विशेषतः नंदुरबार, धुळे, जळगांव, नाशिक जिल्ह्यात शक्यता अधिक काढणीत आलेले कांदा, गहू पिके काढून झाक-पाक केल्यास सुरक्षित होतील. तर काढणीस अवकाश असलेल्या पिकांच्या वरील तारखांच्या अगोदर किंवा नंतर काढणी केल्यास नुकसानीचा तुलनात्मक अंदाज करून शेतकऱ्यांनी काढणीचा निर्णय घ्यावा.

कशामुळे होऊ शकतो पाऊस

समुद्रसपाटी पासून ४ ते ५ किमी. उंचीवर असणारा व देशाचा ४०टक्के असा मध्यवर्ती भुभाग कव्हर करणारा पश्चिमेकडून पूर्वेकडे सरकणारा हवेच्या कमी दाबाचा ‘आस’ व त्याच्या खालच्या पातळीतून उलट दिशेने म्हणजे पूर्वेकडून पश्चिमेकडे तसेच बंगालचा उप सागराहून आग्नेयकडून घुसणारे

आर्द्रतायुक्त पण ‘आसा’ ला घासून गुरुवार दि.१६ मार्च ला वाहणारे वारे यांच्या परस्पर मिलाफ क्रियेतून घडणारी वातावरणीय प्रणालीतुन सध्या लगतच्या राज्याबरोबर महाराष्ट्रात हा अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता वाढली आहे. ही वारे महाराष्ट्राच्या मध्यावर घड्याळ काटा दिशेने चक्रकार पद्धतीने वाहणार असल्यामुळे हे घडून येणार आहे,असेही माणिकराव खुळे यांनी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या