
मुंबई | Mumbai
गेल्या काही दिवसांपासून पावसाचा (Rains) जोर वाढला असून आज संपूर्ण महाराष्ट्रात (Maharashtra) पावसाची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे...
हवामान विभागाने (Meteorological Department) वर्तविलेल्या अंदाजानुसार, मुंबई (Mumbai) पुणे (Pune) जळगाव (Jalgaon) यांसह विदर्भात येलो अलर्ट (Yellow Alert) जारी करण्यात आला असून पुण्यासह जळगावात पावसाची शक्यता आहे. याशिवाय भंडारा जिल्ह्यात (Bhandara District) देखील मुसळधार पाऊस कोसळत आहे.
तसेच कोकणातील रत्नागिरी (Ratnagiri) सिंधुदुर्ग (Sindhudurg) रायगड (Raigad) या जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे समुद्राला (sea) उधाण येण्याची शक्यता आहे. तर राज्यातील अनेक भागांत हलक्या सरी कोसळणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.