राज्यातील ‘या’ जिल्ह्यांत मुसळधार पाऊस; हवामान विभागाकडून येलो अलर्ट

राज्यातील ‘या’ जिल्ह्यांत मुसळधार पाऊस; हवामान विभागाकडून येलो अलर्ट

मुंबई | Mumbai

मागील काही दिवसांपासून पावसाने (Rain) राज्यात धुमाकूळ घातला असून येत्या २४ तासांत पुन्हा मुसळधार पावसाची शक्यता असल्याची माहिती हवामान विभागाने (Meteorological Department) दिली आहे...

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, १२ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट दरम्यान सातारा (Satara) पुणे (Pune) रत्नागिरी (Ratnagiri) सिंधुदुर्ग (Sindhudurg) या जिल्ह्यात येलो अलर्ट (Yellow Alert) असणार आहे. तर कोल्हापूर (Kolhapur) सांगली (Sangli) या जिल्ह्यात तुरळक पावसाची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने ही स्थिती झाल्याची माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली आहे.

दरम्यान, नांदेड जिल्ह्यामध्ये (Nanded District) पुढच्या २४ तासांत विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. याशिवाय विदर्भातील काही जिल्ह्यात १३ आणि १४ ऑगस्ट रोजी पावसाची शक्यता आहे. तर कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात गेल्या पाच ते सहा दिवसांपासून मुसळधार ते अतिमुसळधार पावसाने हजेरी लावली होती.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com