अभियोक्त्यांची पदे बढतीने भरण्याबाबतच्या आदेशाला आव्हान

प्रधान सचिवांना नोटीस
अभियोक्त्यांची पदे बढतीने भरण्याबाबतच्या आदेशाला आव्हान

औरंगाबाद- राज्यातील सर्व जिल्हा शासकीय अभियोक्ता यांची पदे बढतीने न भरण्याबाबत दाखल याचिकेच्या अनुषंगाने मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती संजय गंगापूरवाला व न्यायमूर्ती आर. एन. लड्डा यांनी राज्य शासन तसेच गृह विभाग आणि विधी व न्याय विभागाच्या प्रधान सचिवांना नोटिसा बजावण्याचा आदेश दिला आहे. या याचिकेवर आता चार आठवड्यानंतर सुनावणी होणार आहे.

अंबाजोगाई येथील जिल्हा व सत्र न्यायालयातील वकील पृथ्वीराज कदम यांनी औरंगाबाद खंडपीठात सिद्धेश्वर ठोंबरे यांच्या वतीने याचिका दाखल केली आहे. त्यात त्यांनी म्हटल्यानुसार, राज्य शासनाने जून 2021 मध्ये राज्यातील जिल्हा व सत्र न्यायालय मधील जिल्हा शासकीय अभियोक्ता पदे भरण्याबाबत शासन आदेश निर्गमित केला होता. त्यात जिल्हा शासकीय अभियोक्ता पद केवळ अतिरिक्त लोक अभियोक्ता मधून भरतीने भरण्यात येईल असे म्हटले होते. जिल्हा शासकीय अभियोक्ता केवळ फौजदारी प्रकरणे चालवतील आणि जिल्हा सरकारी वकील केवळ दिवाणी प्रकरणे चालतील अशी त्यात तरतूद होती. आतापर्यंत जिल्हा सरकारी वकील आणि जिल्हा शासकीय अभियोक्ता हे पद एकाच व्यक्तीकडे होते. यासंदर्भात अतिरिक्त व्यवस्थापक संघटनेने 2015 ला औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती. त्यात त्यांनी राज्यातील जिल्हा सरकारी अभियोक्ता हे पद केवळ भरतीने अतिरिक्त अभियोक्ताअतिरिक्त अभियंता या संवर्गाततून भरण्याचे आदेश 2019 ला दीले होते. याचिकाकर्ते जिल्हा सरकारी वकील व जिल्हा शासकीय अभियोक्ता पदासाठी इच्छुक आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com