Wednesday, April 24, 2024
Homeमुख्य बातम्यासप्तशृंगी गडावर आजपासून चैत्रोत्सव

सप्तशृंगी गडावर आजपासून चैत्रोत्सव

सप्तशृंगीगड | वार्ताहर

सप्तशृंगी गडावर चैत्रोत्सव प्रारंभसाठी सहाय्यक जिल्हा अधिकारी विशाल नरवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

- Advertisement -

या आढावा बैठकीत शासकीय निमशासकीय अधिकाऱ्यांनी हजर होते. तसेच यात्राकालावधीसाठी दि ३० मार्च ते ६ एप्रिल दरम्यान होणारी गर्दी कशी नियंत्रित करावी या संदर्भात मार्गदर्शन करण्यात आले.

चैत्र उत्सवात भाविकांची कुठलीही गैरसोय होऊ नये यासाठी सहाय्यक जिल्हाधिकारी यांनी अधिकाऱ्यांना भाविकांच्या मदतीसाठी सतर्क राहण्याच्या सूचना नरवाडे यांनी दिल्या.

अशी असेल सुविधा

बस विभाग

नांदुरी ते सप्तशृंगीगड चैत्रोत्सवा दरम्यान १०० बसेस सुविधा

नाशिक ते सप्तशृंगीगड ७५ बसेस सुविधा

धुळे,जळगाव १७५ बसेस सुविधा

मनमाड ,सटाणा,मालेगाव,१२५ बसेस सुविधा

वैद्यकीय विभाग

या यात्राकलावधीत सप्तशृंगी गडावर येणारी भाविकांची गर्दी लक्षात घेता भाविकांसाठी वैद्यकीय सुविधा परिपूर्ण मिळावी म्हणून सुसज्ज ठिकठिकाणी रुग्णालय ,रुग्णवाहिका १०२ तसेच ,३० खाटांची समता असणारे रुग्णालय आवश्यक ये ईतर सर्व सोयी सुविधासह प्रस्ताविहित आहे.

पोलीस प्रशाशनाची यात्राकलावधीत कडक नजर …

सप्तशृंगी गडावर भाविकांचा सुरक्षेसाठी पोलीस तैनात करण्यात आले आहे.आठ ते दहा लाख भाविकांची यात्रेला उपस्थिती असते, त्यामुळे यात्राकाळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांनी कडेकोट बंदोबस्ताचे नियोजन केले आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

महावितरणची जबाबदारी

सप्तशृंगी गडावर पायी येणाऱ्या भाविक भक्तांना तसेच गावातील वीजपुरवठा खंडित होऊ नये यासाठी महावितरण अधिकारी कर्मचारी सप्तशृंगी गडावर यात्रा कालाधित २४ तास कर्तव्यावर राहणार आहे

वनविभाग व सार्वजनिक बांधकाम विभागाची जबाबदारी

यात्राकलावधीत वनविभाग व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जागेवर अतिक्रमण होऊ नये तसेच रस्त्यावर रुग्णवाहिकेला अडचण निर्माण होउ नये यासाठी वनविभाग व सार्वजनिक विभाग सज्ज असणार आहे

फनिक्यूलर रोपवे

सप्तशृंगी गडावर भाविकांचा सुविधेसाठी व्यवस्था निर्माण केली आहे.तसेच वयोवृद्ध व्यक्तींना रोपवे प्रकल्पात बेठकीची व्यवस्था,पाणपोई,सुलभ सुविधा,सीसीटीव्ही सुविधा,आपत कालीन सुविधा ,ईतर व्यवस्था भाविकांचा हेतू साठी सज्ज आहे

- Advertisment -

ताज्या बातम्या