Monday, April 29, 2024
Homeदेश विदेश'जी-20' चे यजमानपद भारताकडे

‘जी-20’ चे यजमानपद भारताकडे

बाली । वृत्तसंस्था Bali

इंडोनेशियाची(Indonesia) राजधानी बाली ( Bali ) येथे दोन दिवसांच्या जी -20 शिखर परिषदेची (G-20 Summit) याची सांगता झाली. यावेळी इंडोनेशियाचे राष्ट्रपती जोको विडोडो यांनी ‘जी -20चे अध्यक्षपद’ भारताकडे सुपूर्द केले. म्हणजेच आता पुढील जी 20 शिखर परिषद भारतात होणार आहे.

- Advertisement -

यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिखर परिषदेला संबोधित करतांना पंतप्रधान मोदी म्हणाले की,जगाला भौगोलिक-राजकीय तणाव, आर्थिक मंदी यांचा सामना करावा लागत असताना भारत जी-20 ची जबाबदारी घेत आहे. अशा परिस्थितीत जगाला जी20 कडून मोठ्या अपेक्षा आहेत. जी20 चे अध्यक्षपद मिळणे ही प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाची बाब आहे.

पंतप्रधान मोदींनी त्यांच्या दोन दिवसीय दौर्‍यात अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन, ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक, फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन आणि इतर अनेक जागतिक नेत्यांशी अनौपचारिक चर्चा केली आणि अनेक मुद्द्यांवर आपली मते मांडली. यादरम्यान इंडोनेशियाच्या राष्ट्रपतींनी पुढील जी20 परिषदेसाठी पंतप्रधान मोदींना शुभेच्छा दिल्या.

ब्रिटनची भारताला भेट

ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी भारतातील तरुणांना दरवर्षी यूकेमध्ये काम करण्यासाठी 3,000 व्हिसासाठी ग्रीन सिग्नल दिला आहे. त्यामुळे आता भारतीयांना ब्रिटनमध्ये नोकरीसाठी जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात व्हीसाचा लाभ घेणारा भारत हा पहिलाच देश असल्याचे ब्रिटीश सरकारने म्हटले आहे. आज 18-30 वयोगटातील 3,000 सुशिक्षित भारतीय नागरिकांना यूके-इंडिया यंग प्रोफेशनल्स योजनेअंतर्गत दोन वर्षांसाठी यूकेमध्ये येण्याची आणि काम करण्याची संधी देण्यात आली आहे, असें ट्विटमध्ये म्हटले आहे. पंतप्रधान ऋषी सुनक आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी जी-20 शिखर परिषदेमध्ये भेटल्यानंतर काही तासात ही घोषणा झाली.

- Advertisment -

ताज्या बातम्या