सभापती राष्ट्रवादीचा की ठाकरे गटाचा?

महाविकास आघाडीतील सत्ता वाटपाच्या भूमिकेकडे लक्ष
जळगाव कृषी उत्पन्न बाजार समिती
जळगाव कृषी उत्पन्न बाजार समिती

जळगाव jalgaon। प्रतिनिधी

येथील जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (Jalgaon Agricultural Produce Market) 28 एप्रिल रोजी झालेल्या संचालक पदाच्या निवडणुकीनंतर सभापती (Chairman) आणि उपसभापती (Deputy Chairman) पदासाठी संचालकांमधून दावेदारी सुरु झालेली आहे. त्यादृष्टीने संचालकांची मोर्चेबांधणी सुरु असून येत्या आठवड्याभरात महाविकास आघाडीचाच (Mahavikas Aghadi) सभापती आणि उपसभापती निवडला जाईल, असा संचालकांचा सूर आहे. मात्र, सभापती राष्ट्रवादी काँग्रेसचा (NCP Congress) की शिवसेना ठाकरे गटाचा (Shiv Sena Thackeray group) याविषयी उत्सुकता (Got curious) शिगेला पोहोचली आहे.

जळगाव येथील बाजार समितीची संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक नुकतीच झाली. त्यात महाविकास आघाडीला 11, भाजप-शिवसेना शिंदे गट युतीला 6 आणि 1 अपक्ष यांना जागा मिळाल्या आहेत. 18 पैकी 11 जागा जिंकून बहुमत मिळाल्याने साहजिकच महाविकास आघाडीच्या विजयी संचालकांमधून आता सभापती, उपसभापती पदासाठी मोर्चेबांधणी सुरू झालेली आहे. महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना (उबाठा) गटाचे संचालक निवडून आल्याने इच्छुकांनी ज्येष्ठ नेत्यांच्या भेटीगाठी सुरु केल्या आहेत. सभापती आणि उपसभापती पदासाठी प्रत्येकी एक-एक वर्षांचा कालावधी निश्चित करून घेतल्यास अकरापैकी 10 संचालकांना पदाची संधी मिळू शकते.

जळगाव कृषी उत्पन्न बाजार समिती
VISUAL STORY : हास्य जत्रेतील प्राजक्ताचा हा लुक पाहाल तर... काळीज होईल खल्लास...

व्यापारी आणि हमाल मापारी मतदारसंघातील संचालकांना पदे घेता येत नसल्याने उर्वरित 10 संचालक एक वर्षांची सत्ता आपापसात वाटून घेऊ शकतात. त्यानुसार शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसला प्रत्येकी 2 वर्ष आणि उपसभापती पदाची संधी मिळू शकते. या पार्श्वभूमीवर पहिली संधी कोणाला मिळते याकडे जळगाव तालुक्याचे लक्ष लागून आहे.

माजी मंत्री गुलाबराव देवकर आणि माजी सभापती लकी टेलर आणि शिवसेनेचे सुनील महाजन यांची पुढील आठवड्यात सर्व संचालकांची बैठक होऊन निर्णय होण्याची शक्यता आहे. मात्र, महाविकास आघाडीतील संचालक सत्ता कशी वाटप करतात, याकडे लक्ष लागून आहे. त्या दृष्टीकोनातून चाचपणी सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले. आपल्याला संधी मिळावी म्हणून सर्व संचालकांच्या सुप्त इच्छा आहे. मात्र, ज्येष्ठ संचालक सुनील महाजन, लकी टेलर, शामकांत सोनवणे, मनोज चौधरी आदींची नावे सभापती पदासाठी चर्चेत आहेत. तशी ज्येष्ठ नेत्यांकडे मोर्चेबांधणी सुरु असल्याचे वृत्त आहे.

11 मेनंतर सभापतींची निवड

जळगाव येथील बाजार समितीच्या सभापती आणि उपसभापती पदाची निवड 11 ते 15 मे दरम्यान होण्याची शक्यता आहे. संचालक पदाची निवडणूक झाल्यावर 15 दिवसांच्या आत सभापतीची निवड अपेक्षित असते. त्यासाठीचा किमान 7 दिवस आधी अजेंडा द्यावा लागतो. या पार्श्वभूमीवर ही निवड 11 ते 15 मे दरम्यान होण्याची शक्यता आहे.

36 वा सभापती कोण?

जळगाव कृउबा समितीत सन 1982 ते 2022 पर्यंत 35 सभापती होऊन गेले असून 36 वा सभापती कोण होणार याविषयी उत्सुकता लागून आहे. यात ममुराबाद, मोहाडी, जळगाव, आव्हाणे, नशिराबाद, जळके, भादली खु.,तुरखेडा, आसोदा, फुफनगरी, सावखेडा खु., वर्डी, कंडारी,बोरनार, सुजदे, शिरसोली प्र.बो., धानवड, मेहरुण, खेडी खु.,खापरखेडा, धामणगाव आदी गांवाना सभापती पदाचा मान मिळाला आहे. तर काही गावांना दुसर्‍यांदा बहुमान प्राप्त झालेला आहे. आता 36 वा सभापतीपदाचा मान कोणत्या गावाला मिळणार याकडे लक्ष लागून आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com