Saturday, April 27, 2024
Homeमुख्य बातम्याVideo : प्रवाशांनो! ...म्हणून विनाकारण साखळी खेचू नका; नदीच्या पुलावरच जेव्हा ट्रेन...

Video : प्रवाशांनो! …म्हणून विनाकारण साखळी खेचू नका; नदीच्या पुलावरच जेव्हा ट्रेन थांबते

नाशिक | प्रतिनिधी Nashik

अनेकदा रेल्वेने प्रवास करणारे अनेकजन साखळी खेचणे गुन्हा असतानाही अचानक साखळी खेचून धावती ट्रेन थांबवण्याचा प्रयत्न करतात. मात्र, असे करणे गुन्हा आहे सोबतच साखळी खेचल्याने लोको पायलट किंवा रेल्वे कर्मचाऱ्यांना किती मोठ्या संकटाला सामोरे जावे लागू शकते याचे उदाहरण हा व्हिडीओ पहिल्यानंतरच समजते…

- Advertisement -

गोदान एक्स्प्रेस ही ११०५९ या क्रमांकाची रेल्वेगाडी टिटवाळा व खडवली या स्थानकाच्या दरम्यान होती. याचवेळी कुणीतरी अज्ञात प्रवाशाने साखळी खेचली अन गाडी नदीच्या पुलावरच थांबली. गाडी थांबल्यामुळे रेल्वेचे लोकोपायलट खाली उतरले. त्यांनतर येथील अलार्म रिसेट करण्यासाठी त्यांनी प्रयत्न सुरु केले.

सहाय्यक लोको पायलट, सतीश कुमार यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून टिटवाळा व खडवली स्थानकांदरम्यान नदीच्या पुलावर थांबलेली ट्रेन पुन्हा मार्गस्थ केली.

संपूर्ण निष्ठा आणि कर्तव्याचे पालन सतीश कुमार यांनी करत प्रवाशांना सुखरूप पोहोचवले. सतीश कुमार यांच्या कर्तव्यनिष्ठतेचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. लोको पायलटला खाली नदीचे खोल पात्र दिसत असताना त्यांनी जीवाची पर्वा न करता थेट रेल्वेच्या खाली शिरून अलार्म रिसेट केला.

यामुळे रेल्वे पुढे मार्गस्थ होऊ शकली. या घटनेचा व्हिडीओ सहकाऱ्यांनी काढल्यानंतर रेल्वेकडून तो त्यांच्या ट्विटर खात्यावर तो व्हिडीओ पोस्ट करत कर्मचाऱ्यांचे कौतुक करण्यात आले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या