Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्यालाचखोर चव्हाणकेला 'इतक्या' दिवसांची सीबीआय कोठडी

लाचखोर चव्हाणकेला ‘इतक्या’ दिवसांची सीबीआय कोठडी

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

काल नाशिकमध्ये केंद्र सरकारच्या वस्तू व सेवा कर विभागाचा (CGST) अधीक्षक चंद्रकांत चव्हाणके (Chandrakant Chavhanke) याला सीबीआयच्या (CBI) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी आठ हजार रुपयांची लाच घेतांना सापळा रचत अटक (Arrested) केली…

- Advertisement -

आज या लाचखोर अधिकाऱ्याला कोर्टात हजर केले असता कोर्टाने त्याला चार दिवसांची सीबीआय कोठडी सुनावली आहे. चव्हाणकेला अधिक चौकशीसाठी सीबीआयच्या मुंबई कार्यालयात नेणार असल्याची माहिती मिळत आहे.

त्याच्या मालमत्तेची चौकशी करण्यासाठी सीबीआयतर्फे कोठडीची मागणी करण्यात आली होती. कोर्टाने ती मंजूर करत ३० ऑगस्टपर्यंत सीबीआय कोठडी सुनावली आहे.

नाशकातील लाचखोरावर पोळ्याच्या दिवशी ‘संक्रांत’; जीएसटीचा अधिकारी सीबीआयच्या जाळ्यात

दरम्यान, एका व्यावसायिकाचे जीएसटी रजिस्टेशन निलंबित करण्यात आले होते ते पुन्हा सुरु करण्यासाठी वस्तू व सेवा कर विभागाचे अधीक्षक चंद्रकांत चव्हाणके याने आठ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली.

यावरून तक्रारदाराने सीबीआय लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या मुंबई कार्यालयात फोनवरून संपर्क करून तक्रार दिली असता पोलीस उपमहानिरीक्षक राजेश प्रधान यांच्या मार्गदर्शनाखाली सीबीआय लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पथक तात्काळ नाशिक येथे आले.

तक्रारदाराशी संपर्क साधून नवीन नाशकातील केंद्र सरकारच्या वस्तू व सेवा कर विभागाच्या कार्यालयात सापळा रचला. यावेळी अधीक्षक चव्हाणके याला आठ हजार रुपयांची लाच स्वीकारतांना रंगेहात अटक केली.

- Advertisment -

ताज्या बातम्या