सीईटीसाठी विद्यार्थ्यांच्या नशिबी प्रतीक्षा

सीईटीसाठी विद्यार्थ्यांच्या नशिबी प्रतीक्षा

वेळापत्रक होईना जाहीर; 7 लाख 74 हजार 864 विद्यार्थ्यांची नोंदणी

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र, व्यवस्थापन, कृषी, विधी अशा विविध व्यावसायिक पदवी आणि पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांच्या जवळपास 15 सामायिक प्रवेश परीक्षांसाठी (CET) 7 लाख 74 हजार 864 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे...

मात्र या परीक्षांचे वेळापत्रक अद्याप जाहीर न झाल्याने विद्यार्थ्यांचा जीव टांगणीला लागला आहे. या परीक्षांची तयारी करणार्‍या सर्व विद्यार्थ्यांना वेळापत्रक जाहीर होण्याची प्रतीक्षा आहे.

दरवर्षी अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र, कृषी, विधी, बीएड, हॉटेल मॅनेजमेंट, आर्किटेक्चर, एमबीए, एमसीए अशा पदवी व पदव्युत्तर पदवी व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी सीईटी परीक्षा (CET Exam) घेण्यात येते.

त्यातील गुणांच्या आधारे विद्यार्थ्यांना संबंधित अभ्यासक्रमांसाठी प्रवेश दिले जातात. यावर्षी होणार्‍या सीईटीची अर्ज नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाली आहे. मात्र अद्याप परीक्षांचे अंतिम वेळापत्रक जाहीर न झाल्याने विद्यार्थ्यांची चिंता वाढली आहे.

30 ऑगस्ट ते 20 सप्टेंबरदरम्यान परीक्षा

सीईटी सेलमार्फत गेल्या काही वर्षांपासून परीक्षा घेणारी संस्था यावर्षी बदलण्यात आली आहे. व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी होणारी सीईटी घेण्याबाबत निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे. नवीन कंपनीमार्फत परीक्षेचे नियोजन सुरू आहे.

त्यानुसार 30 ऑगस्ट ते 20 सप्टेंबरदरम्यान विविध अभ्यासक्रमांच्या सीईटी परीक्षा होतील. सर्व अभ्यासक्रमांच्या सीईटी 20 सप्टेंबरपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. लवकरच वेळापत्रक जाहीर करण्यात येईल, असे राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत (सीईटी सेल) सांगण्यात आले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com