चीनमध्ये करोनाचा उद्रेक! भारत अलर्टवर, राज्यांना 'या' सूचना

चीनमध्ये करोनाचा उद्रेक! भारत अलर्टवर, राज्यांना 'या' सूचना

दिल्ली | Delhi

चीनमध्ये पुन्हा एकदा करोनाचा विस्फोट झाला आहे. चीनमध्ये (China) करोनाची परिस्थिती पुन्हा एकदा हाताबाहेर जाताना दिसत आहे. दिवसेंदिवस करोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे संपूर्ण जग पुन्हा एकदा हायअलर्टवर आहे. भारतातही विशेष (India Corona) काळजी घेतली जात आहे.

या पार्श्वभूमीवर करोना विषाणुतील नव्या उत्परिवर्तनाची माहिती मिळवण्यासाठी दैनंदिन करोना चाचण्यांत आढळलेल्या नमुन्यांचे संपूर्ण जनुकीय क्रमनिर्धारण (जिनोम सिक्वेन्सिंग) करण्याची सूचना सर्व राज्ये व केंद्रशासित प्रदेशांना केंद्र सरकारने मंगळवारी केली.

चीनमध्ये करोनाचा उद्रेक! भारत अलर्टवर, राज्यांना 'या' सूचना
विवाहितेचा मृतदेह हौदामध्ये आढळल्याने खळबळ, पतीसह सासू पोलिसांच्या ताब्यात.. कुठे घडली घटना?

याबाबत केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे, की असे र्सवकष जनुकीय क्रमनिर्धारण केल्यास देशात उत्परिवर्तित करोना विषाणूंच्या नवीन प्रकारांचा वेळेवर मागोवा व शोध घेणे शक्य होईल. सार्वजनिक आरोग्य राखण्यासाठी विषाणूचा प्रतिबंध करणे आवश्यक असून त्यासाठी उपाययोजना करणे सोपे जाईल.

या पत्रात भूषण यांनी अधोरेखित केले, की विषाणू चाचणी, करोना प्रकरणांचा मागोवा, उपचार, लसीकरण व कोविड प्रतिबंधक वर्तन या पाच स्तरांवर धोरणात भर देण्यात येणार आहे. देशात सध्या आठवडाभरात १२०० रुग्ण आढळत आहेत. अजूनही जगभरात कोविड-१९ चे आव्हान कायम आहे. कारण जगभरात अजूनही ३५ लाख रुग्णांची दर आठवडय़ाला नोंद होत आहे.

चीनमध्ये करोनाचा उद्रेक! भारत अलर्टवर, राज्यांना 'या' सूचना
...म्हणून पत्नीचा केला खून; मृत विवाहितेच्या आईची तक्रार

केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया आज वरिष्ठ अधिकारी आणि तज्ज्ञांसमवेत देशातील कोविड-१९ परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी एक बैठक घेणार आहेत. सध्या भारतात आठवड्याला सुमारे १२०० रुग्णांची नोंद होत आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com