कोरोनाच्या नव्या गाईडलाईन : लसींचे डोस वाया गेल्यास राज्यांना बसणार फटका

कोरोनाच्या नव्या गाईडलाईन : लसींचे डोस वाया गेल्यास राज्यांना बसणार फटका

नवी दिल्ली

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी २१ जूनपासून १८ वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या सर्वांना मोफत लस दिली जाईल, अशी घोषणा सोमवारी केली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी केंद्र सरकारनं राष्ट्रीय कोरोना लसीकरण मोहिमेसाठी गाइडलाइन्स जारी केल्या आहेत. महत्वाची बाब म्हणजे ज्या राज्यांकडून कोरोना लसीचे डोस जास्त वाया घालवले जातील त्याचं निगेटिव्ह मार्किंग केलं जाणार आहे. अशा राज्यांना पुढल्या वेळेस दिल्या जाणाऱ्या लसींचं प्रमाण कमी केलं जाणार आहे. त्यामुळे केंद्राच्या गाइडलाइन्सचं तंतोतंत पालन राज्य सरकारांना करावं लागणार आहे.

कोरोनाच्या नव्या गाईडलाईन : लसींचे डोस वाया गेल्यास राज्यांना बसणार फटका
पंतप्रधान मोदींच्या दोन मोठ्या घोषणा, जाणून घ्या महत्वाचे मुद्दे

नवीन नियमावलीनुसार, केंद्र सरकार व्हॅक्सीन बनवणाऱ्या कंपन्यांकडून खरेदी केलेल्या व्हॅक्सीनपैकी ७५% राज्यांना मोफत दिली जाईल. तसेच, खासगी रुग्णालयांसाठी लसीची किंमत संबंधित कंपन्या ठरवतील. नवीन गाइडलाइनमध्ये लोकसंख्या, कोरोना रुग्णांचं प्रमाण आणि लसीकरणाची गती या आधारावर राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना लसींचं वाटप केलं जाणार आहे.

काय आहे नवीन नियमावली

१) सरकार छोट्या शहरांमध्ये आणि दुर्गम भागात असलेल्या खासगी रुग्णालयांना भौगोलिक असमानता दूर करण्यासाठी लस पुरवठा वाढविण्यात मदत करेल.

२) आता राज्य सरकार लहान रुग्णालयांच्या लसीच्या मागणीची एक ब्लू प्रिंट तयार करेल आणि अशा रुग्णालयांना लसीचा पुरवठा करण्यास केंद्र सरकार मदत करेल. यासाठी दोन्ही स्तरांना एकत्रित काम करावे लागेल.

३) गोरगरीबांना खासगी रुग्णालयांमध्ये लस मिळावी यासाठी आरबीआयकडून ई-व्हाउचर आणले जाईल. हे हस्तांतरणीय नसतील. म्हणजेच, या व्हाउचरचा उपयोग ज्याच्या नावाने जारी केला जाईल केवळ त्या व्यक्तीद्वारेच केला जाऊ शकतो. हे मोबाइल फोनवरून डाउनलोड करता येईल. हे लसीकरण केंद्रांवर स्कॅन केले जाईल.

४) कोणत्या महिन्यात लसीचे किती डोस येणार, याविषयी केंद्र सरकार आधीच माहिती देईल. जेणेकरून प्राधान्य गटांच्या लसींशी संबंधित व्यवस्था करता येईल. कोणत्या तारखेला किती डोस उपलब्ध असतील हे केंद्र सरकार आधीच सांगेल.

५) केंद्राकडून मिळालेल्या माहितीनंतर राज्ये आपल्या सर्व जिल्ह्यांना या लसींच्या पुरवठ्याविषयी माहिती देतील. ही माहिती लोकांपर्यंत उपलब्ध करुन दिली जाईल.

६).प्रत्येकाला लस मिळेल, त्यात कोणाचीही आर्थिक परिस्थिती पाहिली जाणार नाही. परंतु जे लोक पैसे देण्यास सक्षम आहेत, त्यांनी खासगी रुग्णालयात पैसे देऊन लस घ्यावी, असे आवाहन सरकारने करावे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com