Sunday, April 28, 2024
Homeमुख्य बातम्यारामसेतूच्या अस्तित्वावर केंद्रीय मंत्र्यांचं संसदेत मोठं विधान, म्हणाले...

रामसेतूच्या अस्तित्वावर केंद्रीय मंत्र्यांचं संसदेत मोठं विधान, म्हणाले…

दिल्ली | Delhi

भारत आणि श्रीलंकेदरम्यान असलेल्या रामसेतूवरून आतापर्यंत आपल्या देशात अनेक वादविवाद झाले आहेत. देशातील हिंदुत्ववादी संघटना रामायण आणि रामचरित मानसामध्ये उल्लेख असलेला कथित रामसेतू हाच असल्याचा दावा करतो. तर विज्ञानवादी मंडळी ही केवळ कल्पना असून, असा कोणताही सेतू नसल्याचे सांगत असते.

- Advertisement -

याच दरम्यान संसदेत केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी राज्यसभेत एका प्रश्नाच्या उत्तरात रामसेतूसंदर्भात धक्कादायक विधान केलं आहे. भारत आणि श्रीलंका यांच्यात समुद्रात बांधलेल्या रामसेतूचा कोणताही ठोस पुरावा नसल्याचे मंत्री जितेंद्र सिंह यांनी म्हटले आहे. ज्या ठिकाणी पौराणिक रामसेतू असल्याचे मानले जाते. त्या ठिकाणची सॅटलाईट छायाचित्रे घेण्यात आली आहेत. बेट आणि चुनखडी उथळ पाण्यात दिसतात. परंतु हे रामसेतूचे अवशेष असल्याचा दावा करू शकत नाही, असे ते म्हणाले.

सीरिअल किलर ‘चार्ल्स शोभराज’ अखेर तुरुंगाबाहेर… त्याची गुन्ह्यांची कुंडली वाचून तुम्ही हैराण व्हाल

जितेंद्र सिंह म्हणाले की, ‘आमच्या खासदाराने रामसेतूबाबत प्रश्न विचारला त्याबाबत मला आनंद आहे. मात्र या मुद्द्याबाबत आमच्या काही मर्यादा आहेत. कारण हा सुमारे १८ हजार वर्षांपूर्वीचा इतिहास आहे. ज्या सेतूबाबत चर्चा होत आहे तो सुमारे ५६ किमी लांब होता. स्पेस टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून समुद्रामध्ये दगडांचे काही तुकडे दिसून आले आहेत. तसेच त्यामधील काही आकृत्यांमध्ये सातत्य आहे, याचा शोध आम्ही घेतला आहे. समुद्रामध्ये काही बेटे आणि चुनखडकासारख्या काही गोष्टी दिसल्या आहेत.’

धुणे धुण्यासाठी गेलेल्या मायलेकींचा पाण्यात बुडून मृत्यू, हृदय पिळवटून घटना

दरम्यान, असं जरी असलं, तरी तिथे नेमका पूलच होता किंवा त्या ठिकाणी नेमकं कोणतं बांधकाम होतं, हे नेमकं सांगता येणं कठीण असल्याचं सिंह म्हणाले. त्या ठिकाणी नेमकं कोणतं बांधकाम होतं हे नेमकं सांगता येणं कठीण आहे. पण तिथे काही प्रत्यक्ष किंवा काही अप्रत्यक्ष खुणांवरून आणि अवशेषांवरून मात्र, असं म्हणता येईल की तिथे एक बांधकाम होतं, असं सिंह यांनी आपल्या उत्तरात नमूद केलं आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या