Thursday, April 25, 2024
Homeदेश विदेशई-पास बंद होणार : निर्बंध उठवण्याचे आदेश

ई-पास बंद होणार : निर्बंध उठवण्याचे आदेश

नवी दिल्ली

राज्यातील ई-पासवर टीका होत असताना आता केंद्र सरकारनेही राज्यातंर्गत असलेल्या वाहतुकीवरील निर्बंध उठवण्याचे निर्देश दिले आहेत. यामुळे येत्या काही दिवसांत राज्य आणि स्थानिक पातळीवर प्रवासी वाहतुकीसाठी ई-पासची गरज राहणार नाही.

- Advertisement -

ई-पास रद्द करण्यावर निर्णय होणार

राज्यांनी स्थानिक पातळीवर लादलेल्या निर्बंधांमुळे आंतरराज्य आणि राज्यांतर्गत वस्तू आणि सेवांची वाहतूक, पुरवठा साखळी, आर्थिक कामकाज बिघडणे आणि बेरोजगारी वाढणे असे परिणाम होत आहेत आहे. यामुळे केंद्रीय गृहसचिव अजय भल्ला यांनी यासंदर्भात पत्र लिहून निर्दश दिले आहेत. या पत्रात म्हटले आहे की, ‘ केंद्र सरकारने जाहीर केलेल्या अनलॉक-३ च्या नियमावलीचे उल्लंघन करण्यात आले आहे. आंतरराज्य किंवा राज्यांतर्गत वाहतुकीवर कोणतीही बंधने नसतील, असे केंद्र सरकारने अनलॉकिंगच्या नियमावलीत स्पष्ट केले आहे. यासाठी भल्ला यांनी राज्यांना अनलॉक ३ नियमावलीचा संदर्भही दिला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या