Thursday, April 25, 2024
Homeमुख्य बातम्यारात्रीच्या संचारबंदीसह केंद्राच्या राज्यांना या पाच सूचना

रात्रीच्या संचारबंदीसह केंद्राच्या राज्यांना या पाच सूचना

भारतात ओमायक्रॉनची प्रकरणे (Omicron Cases in India) झपाट्याने वाढत आहेत. केरळपासून जम्मू-काश्मीरपर्यंत देशातील 14 राज्यांमध्ये ओमायक्रॉनचा प्रसार झाला आहे. दरम्यान, केंद्र सरकारने (Central Government on Spread of Omicron) राज्यांना पत्र लिहिलं आहे. यामध्ये कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी नाईट कर्फ्यूसारखी (Night Curfew) कठोर पावले उचलण्याचा सल्ला देण्यात आला आहे. यासोबतच केंद्राने राज्यांना वॉर रूम सक्रिय करण्यास सांगितलं आहे.

रणबीरच्या प्रश्नावर आलिया का लाजली?

- Advertisement -

केंद्रीय आरोग्य सचिवांनी वैज्ञानिक अहवालांच्या आधारे राज्यांना सांगितलं आहे, की ओमायक्रॉन कोरोनाच्या डेल्टा प्रकारापेक्षा तिप्पट जास्त संसर्गजन्य आहे. केंद्र सरकारनं म्हटले आहे की, भारतातील अनेक भागात अजूनही डेल्टा व्हेरिएंटची प्रकरणं समोर येत आहेत. अशा परिस्थितीत, स्थानिक आणि जिल्हा स्तरावर राज्य सरकारांनी दूरदृष्टी, डेटा विश्लेषणासह कठोर आणि त्वरित निर्णय घेणं आवश्यक आहे.

Photo कोण आहे मिस युनिव्हर्स झालेली हरनाज संधू

काय आहे केंद्राच्या सूचना

१) सण व उत्सवामुळे रात्रीची संचारबंदी, जमावबंदी लागू करण्याची सूचना केंद्र शासनाने केली आहे. कोरोनाचे रुग्ण वाढल्यावर कंटेनमेंट व बफर जोन करण्यात यावे.

२) टेस्टिंग व सर्वेलांसवर विशेष लक्ष द्यावे. ICMR व आरोग्य विभागाच्या गाइडलाइननुसार टेस्ट करण्यात यावे. डोर-टू-डोर केस सर्च करावे. आरटीपीसीआर टेस्टची संख्या वाढवावी.

३) रुग्णालयात बेड, रुग्णवाहिका व आरोग्याची उपकरण वाढवावे. ऑक्सीजनचा बफर स्टॉक, ३० दिवसांची औषधे करावी.

४) अफवा पसरू नये, यासाठी सातत्याने माहिती द्यावी. रोज प्रेस ब्रीफिंग करावे.

५) राज्यांनी 100% लसीकरणावर फोकस करावे. सर्व जेष्ठांना दोन डोस देण्याचे नियोजन करावे.

- Advertisment -

ताज्या बातम्या