क्षयरोग रुग्ण पाहणीसाठी उद्यापासून केंद्रीय पथक नाशकात

क्षयरोग रुग्ण पाहणीसाठी उद्यापासून केंद्रीय पथक नाशकात

नाशिक । प्रतिनिधी Nashik

महानगराला टीबीमुक्त करण्याच्या दिशेने शासनाने प्रयत्न सुरू केले. शहरात व परिसरात 2800 रुग्ण असून, त्यांतील कमकुवत आर्थिक स्थिती असलेल्या बर्‍याच रुग्णांना मनपाच्या पुढाकारातून निक्षय मित्रांच्या माध्यमातून मदत उपलब्ध करुन देण्यात नाशिक मनपा अगे्रसर असल्याचे दिसून येत आहे.

देशभरातून टीव्ही हद्दपार करण्याच्या उद्देशाने केंद्र शासनाने विशेष उपाययोजना करण्याची मोहीम हाती घेतली असून, त्यादृष्टीने शहरातील टीबी रुग्णांच्या पहाणीसाठी व व्यवस्था तपासणीसाठी केंद्रीय स्तरावरुन दोन आयएएस अधिकार्‍यांची टीम नाशिकच्या पाहणी दौर्‍यावर येत आहे.

त्यांंच्या माध्यमातून दि.31 जुलै व दि.1 ऑगस्टदरम्यान नाशिक परिसरातील टीबी रुग्ण व त्यांच्यावरील उपाययोजनाच्या संदर्भात पहाणी करणार आहेत. या पहाणीत प्रामुख्याने टीबी रुग्ण वाढू नये, यासाठी काय उपाययोजना केल्या जातात?, शहरातील रुग्णालयांची स्थिती काय आहे? रुग्णांवर उपचाराची पध्दत काय आहे? त्यासाठी उपलब्ध असलेल्या सामग्रीचा आढावा घेतला जाणार आहे. त्यासोबतच शहरात रुग्ण तपासणीसाठीच्या शासकीय व खासगी प्रयोगशाळांची ही पाहणी केली जाणार आहे. पाहाणीत टीबीवर उपचार दिल्या जाणार्‍या खासगी रुग्णालयांची देखील याबाबत पहाणी केली जाणार आहे.

नाशिकच्या टीबी रुग्णांंना पोषण आहार उपलब्ध करुन देण्यासाठी जनसामान्यांमध्ये डॉ. आवेश पलोड यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात आली आहे. टीबी रुग्णांचा पोषण आहार देणार्‍या निक्षय मित्र या संकल्पनेला नाशिकमधून उत्तम प्रतिसाद मिळवून देण्यात डॉ. पलोड यांना यश मिळाले आहे. त्यामुळे काही अंशाने काही रुग्णांना दिलासा मिळाला असल्याचे दिसून येत आहे. नागरिकांनी निक्षय मित्र बनण्यासाठी पुढे येण्याचे आवाहन डॉ. पलोड यांनी कले आहे.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com