Thursday, April 25, 2024
Homeमुख्य बातम्याशाळा बनणार 'स्मार्ट'! केंद्राची 'ही' मोठी योजना महाराष्ट्रात लागू होणार

शाळा बनणार ‘स्मार्ट’! केंद्राची ‘ही’ मोठी योजना महाराष्ट्रात लागू होणार

मुंबई | Mumbai

केंद्र सरकारची (Central Government) पीएमश्री योजना (pm shri scheme) महाराष्ट्रात लागू करण्यात येणार आहे. या निर्णयाने महाराष्ट्रातील शाळांचे (School) संपूर्ण स्वरूपच बदलणार आहे. आज झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत याबाबत मोठा निर्णय घेण्यात आला आहे….

- Advertisement -

आजच्या मंत्रीमंडळ बैठकीत प्रधानमंत्री स्कूल फॉर रायजिंग इंडिया ही योजना राज्यात राबवण्याबाबत चर्चा झाली. केंद्र सरकारने सप्टेंबर 2022 रोजी या योजनेची घोषणा केलेली आहे. देशात या योजनेअंतर्गत सुमारे 14 हजार 597 शाळा सुरू करण्यात येणार आहे. या शाळा आदर्श शाळा म्हणून ओळखल्या जातील. 18 लाख विद्यार्थ्यांना याचा फायदा होईल.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

उद्धव ठाकरेंचा मोदी सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, एखाद्या…

‘अशी’ आहे पीएमश्री योजना

स्मार्ट क्लास, ग्रंथालय, कौशल्य प्रयोग शाळा, खेळाचे मैदान, विज्ञान प्रयोगशाळा अशा आधुनिक सोयी व सुविधा असतील. विद्यार्थ्यांच्या गळतीचे प्रमाण कमी करण्यासाठी उपायोजना सुचवल्या जातील. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण या शाळांच्या माध्यमातून अंमलात आणले जाईल. शाळेतील विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढवणे, राज्यातील साक्षरतेचे प्रमाण वाढवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. केंद्र सरकारच्या या पथदर्शी प्रकल्पाची अंमलबजावणी राज्यात करण्याचा प्रयत्न आहे. वास्तविक जीवनाशी निगडित प्रात्यक्षिक शिक्षण देण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.

BBC च्या दिल्ली, मुंबईतील कार्यालयावर Income Tax चे छापे

- Advertisment -

ताज्या बातम्या