Thursday, April 25, 2024
Homeमुख्य बातम्यापंतप्रधान निधीतील 15 व्हेंटीलेटरचा वाद : केंद्राच्या कंपनीने 10 व्हेंटी नादूरस्त पाठविले

पंतप्रधान निधीतील 15 व्हेंटीलेटरचा वाद : केंद्राच्या कंपनीने 10 व्हेंटी नादूरस्त पाठविले

नाशिक । प्रतिनिधी

नाशिक महापालिका क्षेत्रात करोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन राज्य शासनाकडुन निधी आल्यानंतर पंतप्रधान निधीतून नाशिक शहरासाठी 15 व्हेंटीलेटर पाठविण्यात आले होते.

- Advertisement -

यातील 10 व्हेंटीलेटर हे शासनाच्याच ठेकेदार कंपनीने नादुरुस्त स्वरुपात पाठविल्याची गंभीर बाब समोर आली आहे. यामुळे महापालिकेकडुन तातडीने संबंधीत कंपनीला पत्र पाठविण्यात आले असुन तातडीने नवीन व्हेंटीलेटर पाठविण्यास सांगितले आहे.

देशभरात करोनाचा मोठा प्रादुर्भाव वाढत असल्याने सर्वच राज्यांतील मोठ्या शहरांना पंतप्रधान निधीतुन व्हेंटीलेटरसह काही मशिनरी व निधी पाठविण्यात आला होता. यात केंद्र शासनाच्या स्मार्ट सिटी अभियानात निवडल्या गेलेल्या नाशिक शहरासाठी पंतप्रधान निधीतुन 15 व्हेंटीलेटर पाठविण्यात आले होते.

भारत इलेक्ट्रीकल या शासनाच्या कंपनीकडुन हे व्हेंटीलेटर नाशिकला पाठविण्यात आल्यानंतर ती बसवून देण्याचे काम पुणे येथील एका कंपनीला देण्यात आले होते. पुण्याच्या कंपनीकडुन महापालिकेच्या काही रुग्णालयात यातील पाच व्हेंटी बसविण्यात आले.

मात्र यातील शिल्लक असलेला दहा व्हेंटी हे खराब असल्याचे लक्षात आल्यावर पुण्याच्या कंपनीने त्या त्या ठिकाणी बसविले नाही. अशाप्रकारे शासनाच्या कंपनीने नाशिक महापालिकेला नादूरुस्त व्हेंटीलेटर पाठवून फसविल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे.

यामुळे आता शहरातील गंभीर रुग्णांसाठी हे 10 व्हेंटी कुचकामी ठरले असल्याने महापालिकेकडुन तातडीने यासंदर्भात व्हेंटी बनविणार्‍या कंपनीला पत्र पाठविले आहे.

महापालिकेला खराब व्हेंटीलेटर पाठविण्यात आल्याचा गंभीर प्रकार समोर आल्यानंतर याचे पडसाद महासभा व स्थायी समितीत उमटण्याची शक्यता आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या