Tuesday, April 23, 2024
Homeमुख्य बातम्यादेशभरात सर्व नागरिकांना मोफत करोनाची लस; एका व्यक्तीवर किती रुपये होणार खर्च?...

देशभरात सर्व नागरिकांना मोफत करोनाची लस; एका व्यक्तीवर किती रुपये होणार खर्च? जाणून घ्या

भुवनेश्वर | वृत्तसंस्था

देशात कोविड-19 (Covid-19) ची लस पूर्णपणे मोफत देण्यात येईल अशी माहिती केंद्रीय मंत्री प्रताप सारंगी (Pratap Sarangi) यांनी दिली. भाजपकडून बिहारच्या निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर करोनाची लस बिहारमध्ये पूर्णपणे मोफत देण्यात येईल अशी घोषणा केली होती.

- Advertisement -

दरम्यान, याघोषणेनंतर विरोधकांनी भाजपच्या विरोधात दंड थोपटले होते. यानंतर भाजपकडून संपूर्ण देशभरातील नागरिकांना ही लस मोफत देण्यात येईल अशी घोषणा करण्यात आली आहे.

बालासोरमध्ये ३ नोव्हेंबरला निवडणुका आहेत. याठिकाणी एका सभेला संबोधित केल्यानंतर भाजपचे केंद्रीय मंत्री सारंगी यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले सर्वांना करोनाची लस मोफत देण्यात येणार आहे. तसेच एका व्यक्तीच्या लसीला जवळपास ५०० रुपयांचा खर्च येणार असल्याचा अंदाज त्यांनी सांगितला.

- Advertisment -

ताज्या बातम्या