नाशिकच्या तीन सेंटर्सला अन्नपदार्थ आयात करण्याची मान्यता

नाशिकच्या तीन सेंटर्सला अन्नपदार्थ आयात करण्याची मान्यता

नाशिक | प्रतिनिधी Nashik

केंद्र शासनाच्या अन्न आणि सुरक्षा आणि मानक प्राधिकारणाने (Food and Safety and Standards Authority) देशभरातील सात सेंटरला मान्यता दिली असून यामध्ये नाशिक येथील तीन सेंटरचा समावेश करण्यात आला आहे. यामुळे आता यापुढे महामार्गाद्वारे अन्नपदार्थाची वाहतूक करावयाची असल्यास अखंड येथील सेंटरवर माल उतरवता येणार असून कार्गो हवाई सेवेव्दारे (Cargo air service) व समूद्रामार्गे अन्नपदार्थ आल्यास ओझरजवळील जानोरी येथील सेंटरला (janori food store) पदार्थ उतरविता येणार आहे....

याविषयीचे पत्र अन्नसुरक्षा आणि मानक प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण सिंगल (Food and Safety and Standards Authority ceo arun singal)यांनी केंद्रिय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क , डायरेक्टर जनरल ऑफ फॉरेन ट्रेड आणि वाणिज्य विभागाला दिले आहे. शासनाने मंजूर केलेले तीनही सेंटर लवकरच कार्यान्वित होणार असून यामुळे उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार आणि नगर येथील व्यापा - यांना अन्नपदार्थ इम्पोर्ट करण्यासाठी यापुढे मुंबईला जाण्याची गरज पडणार नाही.

नाशिकच्या तीन सेंटर्सला अन्नपदार्थ आयात करण्याची मान्यता
हार्दिक पांड्या उंची घड्याळांचा शौकिन, पाहा त्याच्याकडचे कलेक्शन

उदयोग , व्यवसायिकांना आपला माल मुंबई (Mumbai) ऐवजी थेट नाशिक (nashik) येथील सेंटरवर मागविता येणार असल्याची माहिती खासदार हेमंत गोडसे (Nashik MP Hemant Godse) यांनी दिलीे.

अन्नपदार्थाचे सेंटर नाशिकला झाल्याने उत्तर महाराष्ट्रांतील उदयोग, व्यवसायिकांना फायदा होणार असून अन्नपदार्थ इंपोर्टसाठी (Food Import) त्यांना मुंबईला जाण्यांची गरज पडणार नाही.

पुणे (Pune), मुंबई (Mumbai) आणि नाशिक (nashik हा राज्यांचा विकासासाठी महत्वाचा सुवर्ण त्रिकोण आहे. या तीन शहरांमध्ये जितके प्रकल्प आणि सोयी - सुविधा होतील त्याचा लाभ त्या जिल्हयास आजूबाजूच्या जिल्हयांना होत असतो. या सकारात्मक भूमिकेतून खा. गोडसे यांनी गेल्या काही दिवसांपासून अन्नपदार्थ आयात करण्यासाठी नाशिक येथे अन्नपदार्थ सेंटर व्हावे यासाठी प्रयत्न सुरु केले होते.

मागील वर्षी खासदार गोडसे यांनी तात्कालीन केंद्रिय आरोग्यमंत्री यांची भेट घेऊन त्यांना अन्नपदार्थ आयातीसाठी नाशिक येथे सेंटर होणे किती गरजेचे आहे हे पटवून दिले होते. तुमची मागणी योग्य असून त्यावर लवकरच सकारात्मक निर्णय घेऊ अशी ग्वाही आरोग्यमंत्र्यांसह वाणिज्य मंत्रालयाने खा. गोडसे यांना दिली होती.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com