केंद्र सरकारचे नवे शैक्षणिक धोरण जाहीर

नाशिक । प्रतिनिधी Nashik

पुढील शैक्षणिक वर्षांतही विद्यार्थ्यांचे दप्तराचे वजन कमी करण्यासाठी केंद्राने धोरण आखले आहे. विद्यार्थ्यांच्या वजनाच्या दहा टक्क्यांपेक्षा अधिक दप्तराचे वजन असू नये असे मसुद्यात नमूद केले आहे. त्याचबरोबर विद्यार्थ्यांना देण्यात येणार्‍या गृहपाठाचा भारही या धोरणाने केला आहे.

विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराच्या वजनाचा विषय सातत्याने चर्चेत असतो. वहया, पुस्तके, डबा, पाण्याची बाटली, प्रकल्प, अभ्यासपूरक साहित्य, खेळासाठी स्वतंत्र गणवेश अशा अनेक गोष्टींनी भरलेले दप्तर विद्यार्थ्यांच्या पाठीवर लादले गेले आहे.

दप्तराचे वजन कमी करण्याबाबत न्यायालयातही याचिका दाखल आहेत. या पार्श्वभूमीवर केंद्रशासनाने धोरण तयार करण्यासाठी 2018 मध्ये तज्ज्ञांची समिती नेमली होती. या समितीने दिलेला अहवाल केंद्रीय शिक्षण विभागाने मंजूर केला आहे. या धोरणाप्रमाणे अंमलजबावणी करण्याचे आदेश राज्यांना दिले आहेत.

ती दप्तरे नको

कमी वजनाचे कापड किंवा साहित्य वापरून तयार केलेली दप्तरेच विद्यार्थ्यांना द्यावीत. दोन्ही खांद्यावर लावता येतील अशी आणि मऊ पट्टे असेलली दप्तरे असावीत. त्याचप्रमाणे पाठीवर दप्तराचे वजन नको म्हणून चाके असलेली दप्तरे वापरण्याकडे पालक आणि विद्यार्थ्यांचा अधिक कल आहे. मात्र ही चाके असलेल्या दप्तरांचे वजन अधिक असते. त्यामुळे अशी दप्तरे वापरण्यात येऊ नयेत, अशी सूचना देण्यात आली आहे.

मसुदा काय?

* पूर्वप्राथमिक वर्गाची शाळा शक्यतो दप्तराविना असावी.

* पहिली आणि दुसरीसाठी एक वही तर तिसरी ते पाचवीसाठी एक वर्गातील अभ्यासाची आणि एक गृहपाठाची अशा दोन वह्या असाव्यात.

* सहावीपासून पुढील वर्गातील विद्यार्थ्यांना सुट्टे कागद आणण्याची परवानगी द्यावी.

* कागद संकलित करून ते टाचून (फायलिंग) कसे ठेवावे हे विद्यार्थ्यांना शिकवण्यात यावे. शाळांनी माध्यान्ह भोजन आणि स्वच्छ पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करून द्यावी.

*अधिक वह्या, पुस्तके आणावी लागणार नाहीत असे वेळापत्रक असावे.

* शिक्षकांनी वारंवार विद्यार्थ्यांचे दप्तर तपासावे.


Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *