
मुंबई | Mumbai
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अर्थात CBSE ने 10 वीच्या विद्यार्थ्यांची निकालाची प्रतिक्षा आता संपली आहे. कारण, CBSE ने आज, (शुक्रवारी) 10 वीचा निकाल जाहीर केला. याआधी CBSE ने 12 वीचा निकाल जाहीर केला होता. CBSE ने विद्यार्थ्यांसाठी अधिकृत वेबसाईट cbse.nic.in वर निकाल उपलब्ध करून दिला आहे. विद्यार्थी आपला निकाल तिथे पाहू शकतात.
ऑनलाईन असा चेक करा निकाल (How to check CBSE 12th Result 2023)
सीबीएसई (CBSE )बोर्डाच्या अधिकृत वेबसाईटला व्हिजिट करा.
'सीबीएसई 10 वी रिझल्ट' या लिंकवर क्लिक करा.
आपला रोल नंबर सादर करून सबमिट बटणवर क्लिक करा.
स्क्रीनवर रिझल्ट दिसेल. विद्यार्थी आपला निकालाची प्रत डाऊनलोड करू शकतात.
SMSद्वारे असा चेक करा रिझल्ट
CBSE 10 वाचा निकाल वेबसाईट व्यतिरिक्त एसएमएमद्वारे देखील पाहू शकतात. यासाठी विद्यार्थी cbse 10 रोल नंबर स्कूल नंबर सेंटर नंबर टाईप करून 7738299899 या क्रमांकावर पाठवा.
यंदाची मुलीच मारली बाजी...
CBSE चा 10 वीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. यंदाच्या निकालावर देखील मुलींची छाप दिसत आहे. मुलींनी बाजी मारली आहे. एकूण 90.68 टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत तर मुलांची टक्केवारी 84.67 टक्के आहे.
CBSE ची 10 वीची परीक्षा 15 फेब्रुवारी ते 21 मार्च 2023 दरम्यान झाली. यंदा देशभरातून 21,86,940 विद्यार्थ्यांनी 10 वीची परीक्षा दिली. त्यापैकी मोठ्या संख्येने विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. विद्यार्थ्यांनी आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा शैक्षणिक टप्पा ओलांडला आहे.