मोबाईल चोरणारी टोळी जेरबंद

मोबाईल चोरणारी टोळी जेरबंद

लासलगाव | वार्ताहर Lasalgaon

मोबाईल चोरी करणाऱ्या ( Cell phone Theft Case )मध्यप्रदेश राज्यातील सराईत गुन्हेगारांच्या टोळीला लासलगाव पोलीसांनी जेरबंद केले आहे.या कारवाईत १,१३,०००/- रुपयांचा मुददेमाल जप्त करण्यात आला असून या प्रकरणी लासलगाव पोलिस ठाण्यात( Lasalgaon Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती स.पो. नि. राहुल वाघ यांनी दिली आहे.

पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितनुसार रविंद्र बाबुगिरी गोसावी, रा.जोपुळ ता. चांदवड, यांच्या फिर्यादी वरुन लासलगाव पोलीस ठाण्यात भादवि कलम ३७९ प्रमाणे दिनांक १४ नोव्हेंबर २०२२ रोजी गुन्हा दाखल होता.लासलगाव येथील आठवडे बाजारातुन मोबाईल चोरी जात असल्याने त्यास प्रतिबंध होण्यासाठी लासलगाव आठवडे बाजारात सहा.पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक अजिनाथ कोठाळे, नंदकुमार देवडे पोहवा/ कैलास महाजन, पोलीस कॉन्टेबल प्रदिप आजगे, भगवान सोनवणे, सागर आरोटे, सुजय बारगळ, दगु शिंदे यांचे पथक लासलगाव आठवडा बाजारात गस्त करत असतांना त्यांना दोन इसम संशियत वावरतांना मिळुन आले.

पोलीस ठाण्यात चोकशी केली असता त्यांनी त्यांचे नाव जिददी साबुददीन पारधी वय २० वर्षे,विरेंद्र लखन सिलारे वय २४ वर्षे दोन्ही रा.झिरी ता.जि.हरदा मध्यप्रदेश असे सांगितले त्यांचेकडे फिर्यादीचे मोबाईल बाबत विचापूस केली असता त्यांनी सुरवातीस उडवाउडवीचे उत्तरे दिली सखोल चौकशी करता त्यांनी आठवडे बाजारातुन मोबाईल फोन चोरी केल्याबाबत कबुली दिली तसेच त्यांनी नाशिक जिल्हयातुन इतर आठवडे बाजारातुन मोबाईल फोन चोरी केल्याबाबत कबुली दिली असुन त्यांचेकडुन सुमारे १,१३,००० रु किमंतीचे ०९ मोबाईल फोन हस्तगत करण्यात आले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com