सुरक्षित दिवाळी साजरी करा

महावितरणचे जनतेला आवाहन
सुरक्षित दिवाळी साजरी करा

ना.रोड । प्रतिनिधी Nashik Road

दिवाळीची (diwali) लगबग सुरू झाली असून, सर्वत्र नवचैतन्याचे वातावरण आहे. या दिवाळीचा आनंद द्विगुणित करण्यासाठी ग्राहकांनी विद्युत सुरक्षिततेच्या (electrical safety) उपाययोजनांची अंमलबजावणी करण्याचे व सुरक्षित राहण्याचे आवाहन महावितरणत़र्फे (MSEDCL) करण्यात आले आहे.

दिवाळीत होत असलेली सजावट (Decoration), रोषणाई आणि आतीषबाजी (fireworks) यामुळे दुर्दैवी घटना व्हायला एक कारणही पुरेसे आहे. अशा घटनांनी आनंदाचे वातावरण दु:खात बदलायला वेळ लागत नसल्याने अशा दुर्दैवी घटना टाळण्यासाठी खबरदारी घ्यावी, असे महावितरणने स्पष्ट केले आहे. दिवाळीच्या दिवशी फटाक्याने लागलेल्या आगीच्या (fire) घटना दरवर्षीच मोठ्या संख्येने होतात. यात केवळ आर्थिकच नव्हे तर जीवितहानीही होण्याची शक्यता असते.

सुरक्षिततेची खबरदारी (Safety precautions) न घेतल्याने, निष्काळजीपणा आणि उदासिनता यामुळे अशा घटना होत असतात. आपल्या व आपल्या कुटुंबीयांचा दिवाळीचा आनंद द्विगुणित करण्यासाठी महावितरणने काही खबरदारीचे उपाय सुचविले आहेत. दिवाळी आणि दिवे यांचे एक अतूट नाते आहे. त्यामुळे दिव्यांनी घराची सजावट करताना ती मोकळ्या जागेतच लावावीत.

पडदे, बिछाना यापासून ते लांब असतील याची काळजी घ्यावी. लहान मुले आणि पाळीव प्राण्यांपासून दिवे दूर आणि उंचीवर तसेच पंखे, वीजतारा (Power line) यापासूनही ते दूर ठेवावेत. उच्च दर्जाच्या दिव्यांच्या माळांचा वापर करावा. तुटलेल्या वीजतारा वापरू नयेत किंवा जोड देताना योग्य दर्जाच्या इन्सुलेशन टेपने (Insulation tape) त्या सुरक्षित करून घ्याव्यात. तुटलेले सॉकेट्स वापरू नयेत. घरात कुणीही नसताना सर्व विद्युत उपकरणे (Electrical equipment) बंद करावीत, असे आवाहन महावितरणने केले आहे.

हे लक्षात ठेवा

  • विद्युत यंत्रणा, वीजतारांजवळ वा खाली रोषणाई करणारे फटाके उडवू व फोडू नयेत.

  • विजेच्या उपकरणांजवळ फटाके ठेवू नयेत.

  • एकाच विद्युत सॉकेट्सवर अधिक भार टाकू नये व त्यामध्ये काड्या खोचू नये

  • रोषणाईसाठी वापरण्यात येणारे विद्युत दिवे, त्यांच्या तारा व सॉकेट्स तपासून घ्याव्यात.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com