Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्याबिपीन रावत यांच्यावर आज अंत्यसंस्कार

बिपीन रावत यांच्यावर आज अंत्यसंस्कार

दिल्ली | Delhi

देशाचे माजी लष्करप्रमुख (CDS) बिपीन रावत यांच्यावर आज अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. दुपारी २ वाजता त्यांची अंत्ययात्रा निघणार आहे…

- Advertisement -

तामिळनडूमधील कुन्नूरमध्ये संरक्षण दलाच्या हेलिकॉप्टरला अपघात झाला (MI17 /V5 /India). या दुर्घटनेत 13 जणांचा मृत्यू झाला. या अपघतात देशाचे माजी लष्करप्रमुख CDS बिपीन रावत व त्यांची पत्नी मधुलिका रावत यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. अपघातातील १३ जणांचे पार्थिव काल दिल्लीच्या पालम विमानतळावर आणण्यात आले.

काल रात्री नऊ वाजेच्या सुमारास पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी सर्व पार्थिवांचे दर्शन घेत श्रद्धांजली अर्पण केली.

आज सकाळी गृहमंत्री अमित शाह यांनी आदरांजली वाहिली असून राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आता रावत यांच्या निवासस्थानी पोहोचले आहेत. तसेच राजकीय, सामाजिक सर्वच स्थरातील लोक त्यांच्या पार्थिवाचे दर्शन घेण्यासाठी पोहोचत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या