
दिल्ली l Delhi
भारताचे CDS बिपिन रावत (Bipin Rawat) यांचे हेलिकॉप्टर अपघातात निधन झाले आहे. तामिळनाडुमधल्या कुन्नूर इथं वायुसेनेच्या MI-17V5 हेलिकॉप्टरचा अपघात झाला. या हेलिकॉप्टरमधून चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (CDS) बिपीन रावत, त्यांची पत्नी आणि लष्कर अधिकारी असे एकूण १४ जण प्रवास करत होते.
या दुर्घटनेत बिपीन रावत गंभीररित्या जखमी झाले होते. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र तिथे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला असून देशासाठी ही सर्वात धक्कादायक अशी घटना आहे. रावत यांचे निधन झाल्याच्या वृत्ताला भारतीय हवाईदलाने दुजोरा दिला आहे.
या दुर्घटनेत बिपीन रावत यांच्या पत्नीचाही मृत्यू झाला आहे. या हेलिकॉप्टरमधून बिपीन रावत हे पत्नीसह प्रवास करत होते. यावेळी दोघांचाही मृत्यू झाला. त्यांच्यासह या दुर्घटनेत एकूण १४ जणांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.