VIDEO : 'ती' कुत्र्यांना खायला देत होती, तितक्यातच..., थरकाप उडवणारा प्रकार कॅमेऱ्यात कैद

VIDEO : 'ती' कुत्र्यांना खायला देत होती, तितक्यातच..., थरकाप उडवणारा प्रकार कॅमेऱ्यात कैद

दिल्ली | Delhi

रात्रीच्या वेळी सुसाट वेगाने गाडी चालवल्यामुळे रस्त्यावर झोपणाऱ्या निष्पाप लोकांचे बळी गेल्याचा अनेक घटना आपण ऐकल्या आहेत. अनेक हिट अँड रन प्रकरण आजही सुन्न करु जातं. त्यानंतर अनेक घटना समोर आल्या पण या वेगाला काही आळा बसला नाही. अशीच एक चंदिगढमध्ये (chandigarh girl accident) घडली आहे.

चंदिगढमध्ये भटक्या कुत्र्यांना खायला देत असताना एका तरूणीला भरधाव कारने उडवले आहे. ही घटना मागच्या आठवड्यात शनिवारी (१४ जानेवारी) रात्री घडली. या घटनेत संबंधित तरूणी जखमी झाली असून तिच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. चंदिगढमधील सेक्टर ५३ येथील फर्निचर मार्केटजवळ ही घटना घडली.

याच घटनेचे सीसीटीव्ही फूटेज समोर आले आहे. यामध्ये तरुणी भटक्या कुत्र्यांना खायला देत असल्याचे दिसत आहे. याच वेळी मागून थार गाडीने तिला धडक दिली आहे. या घटनेनंतर तरुणीच्या आजूबाजूचे श्वान पळून गले आहेत. या घटनेमध्ये तेजस्विता गंभीर जखमी झाली आहे. या घटनेनंतर संपूर्ण देशभरात संताप व्यक्त करण्यात येत आहे.

याप्रकरणी सेक्टर-६१ पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. अपघाताची सीसीटीव्ही फुटेज तरुणीचे वडील ओजस्वी कौशलने मिळवली. धडक दिल्यानंतर थार ड्रायव्हर फरार झाला असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत. तेजस्विताच्या वडिलांनी सांगितले की, तेजस्विता आर्किटेक्टमध्ये ग्रॅज्युएट असून, सध्या यूपीएससी परीक्षेची तयारी करत आहे. ती दररोज रात्री आपल्या आईसोबत रस्त्यावरील कुत्र्यांना अन्न देते.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com