गुजरात पूल दुर्घटना : पूल कोसळतानाचं CCTV फुटेज आलं समोर

गांधीनगर | Gandhinagar

गुजरातमधील (Gujarat) मोरबी येथे रविवारी मोठी दुर्घटना घडली. मोरबीमधील प्रसिद्ध झुलता पूल (Morbi Bridge Collapse ) रविवारी संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास कोसळला. या पुलावर उभे असलेले सर्व पर्यटक मच्छु नदीमध्ये पडले. या घटनेनंतर एकच खळबळ उडाली.

मिळालेल्या माहितीनुसार, मोरबी झुलता पूल दुर्घटनेमध्ये आतापर्यंत १४० जणांचा मृत्यू झाला आहे. तर १०० लोकं जखमी झाले आहेत. अनेक जण बेपत्ता झाले असून त्यांचा शोध सुरु आहे. ही घटना घडल्यापासून युद्धपातळीवर बचावकार्य सुरु आहे. दरम्यान पूल कोसळतानाचं सीसीटीव्ही फुटेज (Morbi Bridge Collapse Video) समोर आलं आहे. यामध्ये काही तरुण पुलावर उड्या मारताना दिसत आहेत.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com