Monday, April 29, 2024
Homeमुख्य बातम्याअसा असेल बारावी सीबीएसई पेपरचा बदलेला पॅटर्न...

असा असेल बारावी सीबीएसई पेपरचा बदलेला पॅटर्न…

नाशिक | प्रतिनिधी

सीबीएसईने २०२१ मध्ये घेण्यात येणाऱ्या दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षांसाठी ३० टक्के अभ्यासक्रम कमी करण्याचा निर्णय यापूर्वीच घेतला आहे. आता बोर्डाने पुढील वर्षी होणाऱ्या परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेच्या पॅटर्नमध्येही बदल केला आहे….

- Advertisement -

बारावीच्या प्रश्नपत्रिकांमध्ये यावेळी बहुपर्यायी प्रश्नांना (एमसीक्यू) गुणात्मक दृष्ट्या जास्त महत्त्व दिले गेले आहे. त्याचबरोबर केस स्टडी आधारित प्रश्नांचे वेटेजही वाढले आहे. बहुपर्यायी प्रश्नांचे वेटेज १० टक्क्यांपर्यंत वाढविण्यात आले आहे.

पूर्वी जिथे ज्ञान आधारित प्रश्न विचारले जात असत, त्याऐवजी बोर्ड आता अंडरस्टँडिंग आणि अॅप्लिकेशन बेस्ड प्रश्नांकडे वळत आहे.

भौतिकशास्त्रासारख्या विषयात विचार कौशल्य (thinking skills) आणि तर्क आधारित (reasoning) प्रश्नांचा समावेश करण्यात आला आहे.

त्याच वेळी, जीवशास्त्रातील एमसीक्यूची जागा लघुत्तरी प्रश्नांनी घेतलीली आहे. गणितांमध्ये प्रश्नांची संख्या ३६ वरून ३८ करण्यात आली आहे.

हे आहेत मुख्य बदल एमसीक्यू प्रश्नांना महत्त्व

इंग्रजीत सुमारे ५० टक्के प्रश्न एमसीक्यू प्रकारचे.

गणित आणि फिजिक्स मध्ये केस स्टडी बेस्ड प्रश्न.

फिजिक्समध्ये अॅसर्शन, रिजनिंग बेस्ड प्रश्न.

बायोलॉजीमध्ये एमसीक्यूऐवजी एकेका गुणांचे लघुत्तरी प्रश्न. या प्रश्नांची संख्या ५ वरून वाढवून १४ करण्यात आली आहे.

इकॉनॉमिक्समध्ये एमसीक्यू प्रश्नांची संख्या ८ वरून २० करण्यात आली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या