Saturday, April 27, 2024
Homeदेश विदेशसीबीएसईकडून दहावी, बारावीच्या परीक्षेची तयारी : वेळापत्रक लवकरच

सीबीएसईकडून दहावी, बारावीच्या परीक्षेची तयारी : वेळापत्रक लवकरच

नवी दिल्ली :

यंदा शाळा सुरु झाल्याच नाही. पण सीबीएसईने दहावी, बारावीच्या बोर्डाच्या परीक्षा घेण्याची तयारी चालवली आहे. येत्या काही महिन्यात या परीक्षा घेण्यात येणार आहे, अशी माहिती मंडळाचे सचिव अनुराग त्रिपाठी यांनी वेबीनारमध्ये दिली.

- Advertisement -

सीबीएसईने दहावी, बारावीच्या बोर्डाच्या परीक्षाच्या तारखा लवकरच जाहीर करण्यात येणार आहे. New Education Policy (NEP) 2020 या वेबीनारमध्ये त्रिपाठी यांनी ही माहिती दिली.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन मार्च महिन्यात सुरु झाले. याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या परीक्षांवरही परिणाम झाला. त्यामुळे सीबीएसई दहावी, बारावीचे पेपर नेमके कधी होणार? याबाबत विद्यार्थ्याना प्रश्न पडला होता. मात्र यावर बोर्ड सेक्रेटरी अनुराग त्रिपाठी यांनी याबाबतच वेळापत्रक लवकरच जाहीर करणार असल्याचे सांगितले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या