Friday, April 26, 2024
Homeदेश विदेशCBSE Board Exams दहावीची परीक्षा रद्द तर बारावीची परीक्षा पुढे ढकलली

CBSE Board Exams दहावीची परीक्षा रद्द तर बारावीची परीक्षा पुढे ढकलली

नवी दिल्ली

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी आज शिक्षण सचिव आणि इतर महत्त्वाच्या अधिकाऱ्यांबरोबर सीबीएसईच्या बोर्डाच्या परीक्षेसंदर्भात चर्चा केली. त्यानंतर सीबीएसई बोर्डाच्या दहावीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या आहे. बारावीच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत.

- Advertisement -

परीक्षांसंदर्भात दुपारी १२ वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिक्षणमंत्री आणि इतर अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. त्यात मे महिन्यात होणाऱ्या सीबीएसई बोर्डाच्या दहावीची परीक्षा रद्द तर बारावीची परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर या बैठकीत झालेल्या निर्णयाची माहिती देण्यात आली आहे.

बारावीची परीक्षा घेण्यासंदर्भात १ जूनला परिस्थितीची पाहणी करण्यात येईल, अशी माहिती केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने दिली आहे. त्यामुळे सीबीएसई बोर्डाच्या परीक्षा जूनपर्यंत होण्याची शक्यता आहे.

सध्या वाढलेल्या कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर दहावी आणि बारावीच्या एक लाख विद्यार्थ्यांनी परीक्षा रद्द करा किंवा ऑनलाईन पद्धतीनं घ्या, असी मागणी केली होती. मात्र, सीबीएसईने विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी योग्य उपाययोजना करण्यात आल्याची माहिती दिली होती. विद्यार्थ्यांकडून परीक्षा ऑनलाईन पद्धतीने आयोजित कराव्यात यासाठी मागणी करण्यात येत होती.

सीबीएसईची दहावी आणि बारावीची परीक्षा रद्द करावी असे आवाहन दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केले होते. तर इतर राजकीय पक्षांनी ही मागणी केली होती.

- Advertisment -

ताज्या बातम्या