विद्यार्थ्यांनो अभ्यासाला लागा! १०वी – १२वीच्या परीक्षेची तारीख जाहीर, जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

jalgaon-digital
1 Min Read

दिल्ली | Delhi

सीबीएसईच्या (CBSE Exam) दहावीच्या आणि बारावीच्या परीक्षांच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. बोर्डाने काल परिपत्रक जाहीर करत ही माहिती दिली.

दहावीच्या परीक्षा १५ फेब्रुवारी ते २१ मार्च या कालावधी दरम्यान होणार आहेत. तर बारावीच्या परीक्षा या १५ फेब्रुवारी ते ५ एप्रिलदरम्यान होतील. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाकडून cbse.gov.in या संकेतस्थळावर वेळापत्रक देखील देण्यात आलंय.

समृद्धी महामार्गावर अपघातांचं सत्र सुरूच; भीषण अपघातात चिमुकलीसह महिलेचा मृत्यू

दरम्यान ज्या विद्यार्थ्यांनी या वर्षी सीबीएसई बोर्डाच्या परिक्षेसाठी अर्ज केला आहे ते बोर्डाच्या अधिकृत वेबसाइट cbse.gov.in आणि cbse.nic.in वर जाऊन तारीख पत्रकाची PDF डाउनलोड करू शकतात.

असे डाऊनलोड करा वेळापत्रक

वेळापत्रक डाऊनलोड करण्यासाठी cbse.gov.in किंवा cbse.nic.in या संकेतस्थळाला भेट द्यावी

दहावी, बारावी परीक्षा शेड्युल २०२३ वर क्लिक करावे

त्यानंतर दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या दोन वेगवेगळ्या पीडीएफ तुम्हाला स्क्रिनवर दिसतील

विद्यार्थ्यांना दहावी, बारावी परीक्षेची डेटशीट डाऊनलोड करावी

क्रिकेटर ऋषभ पंतच्या गाडीला भीषण अपघात, पंतला गंभीर दुखापत

यावेळी ३४ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी १०वी आणि १२ वी बोर्ड परीक्षासाठी नोंदणी केली आहे. करोना काळात गेल्या वर्षी सीबीएसईनं परीक्षा दोन टर्ममध्ये घेतल्या होत्या. यंदा मात्र तसं होणार नसून परीक्षा एकाच टर्ममध्ये घेतली जाणार आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *