CBSE 12th Result बारावीचा निकाल जाहीर, वेबसाइट क्रॅश झाल्यास असा पहा निकाल

निकाल
निकाल

नवी दिल्ली

सीबीएसईच्या बारावी 12 वी परीक्षेचा निकाल (CBSE 12th Result 2021) जाहीर झाला आहे. सीबीएसई बोर्डाची अधिकृत वेबसाईट cbseresults.nic.in यावर हा निकाल जाहीर झाला. बारावीत 99.37% विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्यात विद्यार्थीनींचे प्रमाण 99.67% तर विद्यार्थ्यांचे प्रमाण 99.13% आहे.

निकाल
नाशिकमधील निर्बंध शिथिलतेसंदर्भात आज फैसला, बैठकीत हे निर्णय होणार

सीबीएसईने यासाठी एक अधिकृत नोटिफिेकेशन काढलं आहे. सीबीएई बोर्डाच्या (CBSE) विद्यार्थ्यांच्या १२ वीच्या परीक्षांचे (hsc result) निकाल आज दुपारी २ वाजता जाहीर केला. निकाल जाहीर झाल्यावर ट्रैफिकमुळे वेबसाइट क्रॅश होते. त्याला पर्यायी व्यवस्था सीबीएई बोर्डाने केली आहे.

वेब पोर्टल

खाली दिलेल्या वेबसाईटवर निकाल पाहता येणार आहे.

www.results.nic.in

www.cbseresults.nic.in

www.cbse.nic.in

examresults.com

उमंग ऍप

विद्यार्थी आपला निकाल उमंग मोबाइल प्लेटफॉर्म म्हणजेच उमंग ऍपवर पाहू शकतात. हा ऍप एंड्रॉइड, iOS व विंडोज-आधारित स्मार्टफोनवर उपलब्ध आहे.

SMS

विद्यार्थी SMS ने निकाल मागवू शकतात. मोबाइलवर cbse12 टाइप करुन 7738299899 या क्रमांकावर संदेश पाठवल्यास निकाल मिळतो.

टेलीफोन व IVRS

टेलीफोन कॉल किंवा इंटरैक्टिव वॉइस रिस्पॉन्स सिस्टम (IVRS) ने निकाल मिळवता येईल. यासाठी 011 – 24300699 क्रमांकावर फोन करावा लागेल.

डिजिलॉकर

निकालाचे गुणपत्रक डिजीलॉकरवर शेअर करण्यात येणार आहे. डिजिलॉकरवर आधार कार्ड नंबर व आधारशी संलग्न मोबाइल नंबरचा उपयोग करावा लागेल. डिजिलॉकर मोबाइल ऍप गूगल प्ले या एपल स्टोर से डाउनलोड किया जा सकता है।

गूगल प्ले

https://play.google.com/store/apps/details?id=com.digilocker.android

असा लावला निकाल

दहावीच्या 5 विषयांपैकी 3 विषयांचे सर्वोत्कृष्ट गुण घेतले गेले. त्याचप्रमाणे अकरावीच्या सरासरी पाच विषयांची सरासरी घेण्यात येणार आहे. 12 वीच्या पूर्व-बोर्ड परीक्षा व प्रॅक्टिकल गुण घेण्यात येतील. दहावीच्या गुणांची 30%, 11 व्या गुणांच्या 30% आणि 12 वी च्या 40% गुणांवर आधारित निकाल असेल.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com