Thursday, April 25, 2024
Homeमुख्य बातम्यासीबीआय राज्यात पुन्हा येणार?

सीबीआय राज्यात पुन्हा येणार?

मुंबई । प्रतिनिधी Mumbai

राज्यात एकनाथ शिंदे आणि भाजपचे सरकार ( Shinde- Fadnavis Government )स्थापन झाल्यानंतर महाविकास आघाडी सरकारचे ( Mahavikas Aaghadi ) निर्णय बदलण्याचा धडाका सुरु आहे.

- Advertisement -

महाविकास आघाडी सरकारचे अनेक निर्णय एकनाथ शिंदे यांच्या सरकारकडून बदलण्यात आले आहेत. आता, त्यामध्ये आणखी एका निर्णयाची भर पडणार आहे. ठाकरे सरकारने सीबीआयला ( CBI)राज्य शासनाची परवानगी घेतल्याशिवाय तपास करता येणार नाही, असा निर्णय घेतला होता. तो निर्णय बदलला जाणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

महाविकास आघाडी सरकारने राज्यात तपास करण्यासाठी सीबीआयला बंदी घातली होती. एकनाथ शिंदे यांचे सरकार सीबीआयला राज्यात तपासासाठी परवानगी देणार असल्याची माहिती समोर आली आहे. ठाकरे सरकारच्या काळात सीबीआयच्या तपासावर घातलेली बंदी उठवण्यासाठी हालचाली सुरु झाल्या आहेत.

उद्धव ठाकरेंच्या नेतृत्त्वातील महाविकास आघाडी सरकार असताना 21 ऑक्टोबर 2020 रोजी सीबीआयला राज्यात तपास करण्यासाठी राज्य सरकारची परवानगी घेणे आवश्यक असल्याचा निर्णय घेण्यात आला होता. ठाकरे सरकार सत्तेत असताना परवानगीशिवाय राज्यात सीबीआयला तपासणीचे अधिकार नव्हते. आता राज्यातील महाविकास आघाडी सरकार पायउतार झाले आहे.

आता राज्यात एकनाथ शिंदे यांचे भाजपच्या पाठिंब्यावर सरकार आहे. आता राज्यात सत्तांतर झाल्यानंतर शिंदे आणि फडणवीस सरकारकडून सीबीआयला तपासाचे अधिकार दिले जाणार आहेत, अशी माहिती आहे. राज्य सरकार येणार्‍या काही दिवसांमध्ये मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेतला जाणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

- Advertisment -

ताज्या बातम्या