Thursday, April 25, 2024
Homeमुख्य बातम्याबिहारमध्ये 'या' नेत्यांच्या घरांवर सीबीआयचा छापा

बिहारमध्ये ‘या’ नेत्यांच्या घरांवर सीबीआयचा छापा

नवी दिल्ली | New Delhi

बिहारमध्ये (Bihar) बहुमत चाचणीआधी (Floor Test) सीबीआयने (CBI) राष्ट्रीय जनता दलाच्या (RJD) नेत्यांच्या घरांवर छापे टाकण्यात आले आहेत. त्यामुळे बिहारमधील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे…

- Advertisement -

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, जमीन देवाण-घेवाण प्रकरणी पाटणा (Patna) येथील आरजेडी आमदार सुनील सिंह (MLA Sunil Singh) आणि राज्यसभा खासदार अशफाक करीम (MP Ashfaq Karim) यांच्या घरांवर छापेमारी करण्यात आली आहे. बिहारमध्ये आरजेडी नेत्याची आज विधानसभेत बहुमत चाचणी होत असताना सीबीआयकडून छापा टाकण्यात आला आहे.

दरम्यान, लालू प्रसाद यादव (Lalu Prasad Yadav) रेल्वेमंत्री असताना नोकरी देण्याच्या बदल्यात जमीन आणि भूखंड घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणाच्या तपासानंतर सीबीआयने लालू प्रसाद यादव, राबडी देवी, मिसा यादव, हेमा यादव आणि काही संबंधित व्यक्तींवर गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या