Friday, April 26, 2024
Homeदेश विदेशCBI ची मोठी कारवाई! कार्ती चिदंबरम यांच्या मालमत्तांवर छापेमारी

CBI ची मोठी कारवाई! कार्ती चिदंबरम यांच्या मालमत्तांवर छापेमारी

दिल्ली। Delhi

काँग्रेसचे (Congress) ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम (P Chidambaram) यांचे सुपुत्र कार्ती चिदंबरम (Karti Chidambaram) यांच्या अडचणीत पुन्हा एकदा वाढ झाली आहे.

- Advertisement -

कथित बेकायदेशीर व्यवहार आणि बेहिशोबी मालमत्ते प्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाकडून (CBI) आज ११ ठिकाणी एकाच वेळी छापे टाकण्यात आले आहेत. चिदंबरम यांच्या दिल्ली, मुंबई, चेन्नई आणि तामिळनाडू येथील कार्यालयांवर आणि घरांवर कारवाई सुरू आहे.

दरम्यान कार्ती चिदंबरम यांनी या छाप्यांवर प्रतिक्रिया दिली असून “आता मी मोजणी थांबवली आहे. हे किती वेळा घडले? याचीही नोंद व्हायला हवी.” असे त्यांनी ट्विट केले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कार्ती चिदंबरम आणि त्यांच्या साथीदारांविरुद्ध विविध फौजदारी कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कार्ती चिदंबरम यांनी चिनी कंपन्यांमधील लोकांना आपली खास ओळख वापरुन व्हिजा दिल्याचा आरोप त्यांच्यावर लावण्यात येत आहे.

तसेच, या व्हिजाच्या बदल्यात ५० लाख रुपये घेतल्याचाही ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. त्यावेळी त्यांचे वडील पी. चिदंबरम केंद्रीय गृहमंत्री होते. २०११ सालची ही घटना आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या