अनिल देशमुख यांना क्लीन चिट? CBI ने दिली ही माहिती

अनिल देशमुख यांना क्लीन चिट? CBI ने दिली ही माहिती
गृहमंत्री अनिल देशमुखअर्णब गोस्वामी आणि कंगना रनौत यांची पोलीस चौकशी करणार!

नवी दिल्ली

केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI ) केलेल्या प्राथमिक चौकशीत राज्याचे माजी गृहमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अनिल देशमुख (anil deshmukh)यांना ‘क्लीनचिट’ देण्यात आली असल्याचा दावा करणारी कागदपत्रे गेल्या दोन दिवसांपासून सोशल मीडियावर फिरत आहेत. सीबीआयचा हा ६५ पानी अहवाल आहे. उपअधीक्षक आर एस गुंजाळ यांनी हा अहवाल सादर केला. परंतु याच्या सत्तेत्तेवर प्रश्नचिन्ह आहे. आता सीबीआयकडून यासंदर्भात खुलाशा करण्यात आला आहे.

गृहमंत्री अनिल देशमुख
बॉलीवूड अभिनेत्यांच्या बॉडीगार्डचे पगार ऐकून थक्क व्हाल ?

सीबीआयने म्हटले आहे की, आमच्याकडे अनिल देशमुख (anil deshmukh)यांच्यासंदर्भात सातत्याने विचारणा होत आहे. मुंबई उच्च न्यायालयात दाखल याचिकेनंतर सीबीआयने तपास सुरु केला आहे. त्यानंतर तपासात मिळालेल्या पुराव्यानंतर आम्ही गुन्हा दाखल केला. २१ मे रोजी सीबीआयने एफआयआर (FIR) दाखल केला आहे. त्याची प्रत सीबीआयच्या वेबसाइटवर आहे. या प्रकरणाचा तपास अजून सुरु आहे.

आता सीबीआय डॉक्यूमेंटची कॉपी पहिली व्हायरल झाली होती त्यावर कुठल्याही अधिकाऱ्याचे हस्ताक्षर नाहीत. त्यामुळे ती कॉपी किती विश्वासनीय आहे हा चौकशीचा विषय आहे. तर दुसरीकडे इंडिया टुडेने दावा केल्यानुसार त्यांच्याकडे सीबीआय अधिकारी यांच्या हस्ताक्षराची कॉपी आहे. त्या व्हायरल कॉपीवर सीबीआयनं स्पष्टीकरण दिलं नाही परंतु या प्रकरणात तपास सुरू आहे. काही ठोस पुरावे आल्यानंतरच यावर प्रतिक्रिया दिली जाईल असं सांगण्यात आलं आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com