नाशकातील लाचखोरावर पोळ्याच्या दिवशी ‘संक्रांत’; जीएसटीचा अधिकारी सीबीआयच्या जाळ्यात

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

गेल्या काही दिवसांपासून नाशकात लाचखोरीच्या घटना घडत आहेत. आरोग्य उपसंचालक विभागातील लेखाधिकाऱ्याला रंगेहाथ पकडल्यानंतर काल एसीबीने एसीबीने नाशकात दोन सापळे रचले होते….

काल नाशकात आदिवासी विकास विभागाच्या कार्यकारी अभियंत्याला एसीबीने पकडले तर दिंडोरी तहसील कार्यालयातील मंडळ अधिकाऱ्याला १० हजारांची लाच घेताना पकडण्यात एसीबीला यश आले.

नाशकात ‘मोठा मासा’ एसीबीच्या जाळ्यात; तब्बल २८ लाखांची लाच घेताना पकडले रंगेहाथ

नाशिकहून मुंबईत सीबीआयच्या लाचलुचपत प्रतीबंधक विभागाला फोन क्रमांकावर तक्रार आल्यानंतर नाशिक येथे येत तात्काळ कारवाई करत वस्तू व सेवा कर विभागाच्या (जीएसटी) अधीक्षकाला आठ हजार रुपयांची लाच घेतांना सापळा रचत अटक केली.

याबाबत सविस्तर वृत्त असे कि,एका व्यावसायिकाचे जीएसटी रजिस्टेशन निलंबित करण्यात आले होते ते पुन्हा सुरु करण्यासाठी वस्तू व सेवा कर विभागाचे अधीक्षक चंद्रकांत चव्हाणके याने आठ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली.

यावरून तक्रारदाराने सीबीआय लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या मुंबई कार्यालयात फोनवरून संपर्क करून तक्रार दिली असता पोलीस उपमहानिरीक्षक राजेश प्रधान यांच्या मार्गदर्शनाखाली सीबीआय लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पथक तात्काळ नाशिक येथे आले व तक्रारदाराशी संपर्क साधून नवीन नाशकातील केंद्र सरकारच्या वस्तू व सेवा कर विभागाच्या कार्यालयात सापळा रचला. यावेळी अधीक्षक चव्हाणके याला आठ हजार रुपयांची लाच स्वीकारतांना रंगेहात अटक केली.

सीबीआय चे आवाहन

नागरिकांनी काही तक्रार असल्यास केंद्र सरकारच्या भ्र्रष्ट कर्मचारी किंवा अधिकाऱ्यांच्या विरोधात तक्रार करण्यासाठी सीबीआय चे लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालय मुंबई येथे ०२२-२६५४३७०० व ८४३३७००००० या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन सीबीआय लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पोलीस निरीक्षक रणजितकुमार पांडेय यांनी केले आहे.


Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *