Sunday, April 28, 2024
Homeमुख्य बातम्याAaditya Thackeray : सुशांत सिंह राजपूत, दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंकडून उच्च...

Aaditya Thackeray : सुशांत सिंह राजपूत, दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंकडून उच्च न्यायालयात कॅव्हेट दाखल

मुंबई | Mumbai

दिशा सालियान (Disha Salian) आणि सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) आत्महत्या (Suicide) प्रकरणात शिवसेना नेते आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी उच्च न्यायालयात कॅव्हेट दाखल केले आहे. या प्रकरणात कोणताही निर्णय घेण्यापूर्वी आमची बाजू ऐकून घ्यावी अशी मागणी आदित्य ठाकरे यांनी केली आहे.

- Advertisement -

Dada Bhuse : “माझी हवी तर चौकशी करा पण…”; ललित पाटील ड्रग्ज प्रकरणात सुषमा अंधारेंच्या आरोपावर मंत्री दादा भुसेंचे स्पष्टीकरण

दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले असून या प्रकरणी उच्च न्यायालयात (High Court) एक याचिकाही दाखल करण्यात आली आहे. तसेच राशिद खान पठाण यांनी बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत आणि दिशा सालियान आत्महत्या प्रकरणी शिवसेना आमदार आदित्य ठाकरे यांची चौकशी करण्यात यावी अशी मागणी करणारी याचिका दाखल केली आहे.

Maharashtra Drug Case : ड्रग्ज माफिया ललित पाटीलला ‘इतक्या’ दिवसांची पोलीस कोठडी

तसेच पठाण यांनी या प्रकरणात आदित्य ठाकरे यांना ताब्यात घेण्यात यावे आणि त्यांची चौकशी (inquiry) करण्यात यावी अशी मागणी केली आहे. त्यानंतर आता आदित्य ठाकरे यांनी यावर कोणताही निर्णय घेण्यापूर्वी आपली बाजू न्यायालयाने ऐकून घ्यावी अशी मागणी करत एक कॅव्हेट दाखल केले आहे.

Lalit Patil Arrested : ड्रग्ज माफिया ललित पाटीलला अटक; मुंबई पोलिसांची कारवाई

काय आहे याचिका?

०८ जून २०२० रोजी दिशा सालियान, आदित्य ठाकरे, राहुल कनाल, सुरज पांचोली, सचिन वाझे, एकता कपूर यांचे मोबाईल लोकेशन तपासले जावे, कारण त्या रात्री हे सगळे १०० मीटरच्या परिसरात एकत्रच होते. तसेच १३ व १४ जून २०२० रोजीचं सुशांतसिंह राजपूत, रिया चक्रवर्ती, आदित्य ठाकरे, अरबाज खान, संदिप सिंह, शौविक चक्रवर्ती या सर्वांचेही मोबाईल लोकेशन तपासले जावेत. तसेच या दोन्ही दिवसांचे आसपासच्या परिसरातील आदित्य ठाकरेंशी संबंधित सारे सीसीटीव्ही फुटेज तपासले जावे, अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे. तर सुशांतसिंह राजपूतचा मृत्यू झाला त्यादरम्यान आदित्य ठाकरे आणि रिया चक्रवर्ती यांच्यात ४४ वेळा फोनवर काय बोलणं झालं? याची चौकशी व्हायला हवी. सुशांत आणि दिशाच्या मृत्यूवर सवाल उठवणाऱ्या सर्व साक्षी पुराव्यांची सखोल चौकशी व्हावी, अशी देखील मागणी त्या याचिकेत करण्यात आली आहे.

‘देशदूत’ / ‘सार्वमत’चे व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Political Special : राजकीयदृष्ट्या उत्तर महाराष्ट्रातील नाशिक होतंय ‘बारामती’; नेत्यांचे सतत दौरे, घडामोडींना वेग

- Advertisment -

ताज्या बातम्या